नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव विधानसभा मतदार संघातील आदिवासी समाज बांधवाचा सन्मान सोहळा व भगवान एकलव्य यांच्या ८१ मूर्तींचा पुजन सोहळा आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संपन्न झाला.
मेळाव्याच्या सुरवातीला आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सर्व आदिवासी समाज बांधवाचे स्वागत करून आमदार निधी अंतर्गत मतदार संघातील सर्व आदिवासी वस्तीवर वीस लाख रुपयांचा सभा मंडप मंजूर झाला असून या सभा मंडपा चे भुमी पुजन लवकरच संपन्न होणार असल्याचे सांगितले तसेच आपण स्वतःच्या स्वखर्चातून भगवान विर एकलव्य यांची आकर्षक सुंदर मूर्ती प्रत्येक आदिवासी वस्तीवर देण्याचे ठरविले होते . त्या सर्व मूर्तींचे एकत्रित पूजन करून सर्व आदिवासी बांधवांना सन्मानित करावे असा आपला मानस होता. आणि या अनुषंगाने आज नांदगाव मार्केट कमिटी पटांगणावर भगवान विर एकलव्य मूर्ती पूजन व आदिवासी समाज बांधवांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
याप्रसंगी भगवान एकलव्य यांच्या ८१ मुर्त्या स्थापित करण्यात आल्या होत्या प्रत्येक मूर्ती समोर एक होम बनविण्यात आलेला होता सर्व होम आणि परिसरात झेंडूची फुले तसेच रांगोळीने सजवण्यात आले होते .तसेच प्रत्येक मुर्ती शेजारी भगवान शंकराचा आकर्षक फोटो ठेवण्यात आला होता .प्रत्येक मूर्ती समोर दोन आदिवासी कुटुंब पूजेत बसले होते या पूजेसाठी जवळपास दीडशे पुरोहित आमंत्रित केले होते.

आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजूमताई कांदे हे स्वतः पूजेस बसले होते.पूजा झाल्यानंतर आमदार कांदे व सौ. कांदे यांनी सर्व १६२ आदिवासी कुटुंबीयां पर्यंत जाऊन हात जोडून त्यांना स्वागत व नमस्कार केला .यावेळी प्रत्येक आदिवासी बंधू भगिनींचा सत्कार करून त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले.

याप्रसंगी बोलताना आमदार सुहास आण्णा कांदे म्हणाले की हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही त्यामुळे या कार्यक्रमास आदिवासी बांधव तसेच सर्व राजकीय नेतेमंडळी तसेच सामाजिक नेते मंडळीं उपस्थित आहेत. मतदार संघाच्या प्रत्येक वंचित घटकाचा विकास करणे हे माझे कर्तव्य असून यापुढे आदिवासी समाजातील तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊ नये म्हणून प्रत्येक आदिवासी वस्तीवर व्यायामशाळा ( जीम ) आणि वाचनालयाची निर्मिती येत्या वर्षभरात करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना दिली. मी पहिल्यांदाच पूजेला बसणार असल्याने माझ्याकडून काही चूक झाली तर सर्व आदिवासी बांधवांनी मला पदरात घ्यावे मला माफ करावे असे भावनिक आवाहन आमदार कांदे यांनी यावेळी केले.
आदिवासी समाज बांधवांसाठी या आधी असा सामाजिक कार्यक्रम कोणीही घेतला नाही , आदिवासी समाज नेहमी राज करण्यापासून दुर्लक्षित केला गेला ही नाळ पकडुन आमदार सुहास कांदे यांनी आदिवासी बांधवांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी इतक्या मोठ्या भव्य स्वरूपात कार्यक्रम घेऊन आदिवासी माता भगिनीचा सन्मान केला .या बद्दल उपस्थित आदिवासी बांधवांनी आमदार कांदे यांचे आभार मानले.
कार्यक्रमास जेष्ट नेते बापूसाहेब कवडे,साईनाथ गिडगे, विष्णू निकमसर, प्रमोद भाबड,किरण देवरे,किरण घुगे,राजेश कवडे, सुभाष कुटे, तेजदादा कवडे,एकनाथ सदगीर, विलासभाऊ आहेर,वाल्मीक हेंबाडे,अंकुश कातकाडे,विजय इप्पर,भावराव बागुल,राजाभाऊ देशमुख,अमोल नांवदर, राजेंद्र पवार,सुनील जाधव,सौ. रोहीणी मोरे यांच्यासह हजारो शिवसैनीक उपस्थीत होते .















