loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड पूरग्रस्त भागाला आमदार कांदे यांची भेट, पूरग्रस्तांना भेटून दिले मदतीचे आश्वासन

Sep 19, 2022


मनमाड शहर परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले.प्रशासनाने लागलीच रात्रभर यंत्रणा राबवत प्रभावित नागरिकांना व कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलविल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आज सकाळी आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांनी नदी काठी जाऊन आपत्तीग्रस्तांना भेट दिली तसेच पूर परिस्थितीची पाहणी केली यावेळी तहसीलदार सिद्धार्थ मोरे , मनमाड नगरपरिषद मुख्याधिकारी पटेल साहेब, कृषी अधिकारी, आरोग्याधिकारी, पोलीस, पंचायत समिती चे अधिकारी उपस्थित होते


आज आलेल्या पुर परिस्थितीमुळे आणि भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये म्हणून या पुलाचे काम सुरू करण्यात येईल व या साठी 5 कोटी रुपये मंजूर केले असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्ती ग्रस्थांशी बोलताना आमदार साहेबांनी धीर दिला, मोठे नुकसान झालेल्या कुटुंबीय महिलांशी बोलतांना धीर देत सर्व संसार उपयोगी साहित्य व अन्न धान्य त्वरित देणार असल्याचे जाहीर केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.