Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शास्रज्ञ डॉ.ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी यांची व्ही.जे.हायस्कुलला भेट : ऑनग्रेड सोलरसिस्टीम चे उद्घाटन

Sep 19, 2022

नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे )
नांदगाव शहरातील व्ही.जेहायस्कुल, येथे जागतिक पहिल्या सौर उष्णतेवर आधारित वातानुकुलीत तंत्रज्ञानाचा शोध लावणारे शास्रज्ञ व सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली यांचे वंशज डॉ.ओमप्रकाश कुलकर्णी यांनी शाळेला भेट देऊन शाळेच्या १९७७ च्या बॅच च्या माजी विद्यार्थांनी शाळेला दिलेल्या ऑनग्रेड सोलरसिस्टीम चे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.सुरवातीला शाळेच्या प्रांगणात एन.सी.सी. व लेझीम पथकाच्या विद्यार्थांनी त्यांचे स्वागत केले.त्यानंतर शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे व मुख्याध्यापिका जोत्स्ना आव्हाड यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.भैय्यासाहेब चव्हाण यांनी शाळेविषयी व शाळेतील विविध उपक्रमाची माहिती दिली. डॉ.ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी यांनी या भेटीत आपले मनोगतात त्याच्या जीवनातील आठवणी सांगितल्या नांदगाव ला माझा जन्म झाला आहे या गावात मला पुन्हा भेटण्याचा योग आला त्यामुळे मला आत्मिक आनंद झाला व त्याच बरोबर त्यांच्या जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या.त्यात माजी राष्ट्रपती मा.डॉ.अब्दुल कलाम यांच्याबरोबर केलेल्या कामाच्या आठवणी सांगितल्या .त्यांनी विविध देशात व राज्यात उर्जा विषयक सल्लगार म्हणून काम पहिले आहे.त्यांनी शाळेला भेट देऊन शाळेचे विविध उपक्रम व नाविन्याचा ध्यास घेणारी ह्या शाळेचे कौतुक केले व मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या संबधित ऑनग्रेड सोलरसिस्टीम चे उद्घाटन माझ्या हस्ते शाळेने केले त्याबद्दल शाळेचे आभार मानले व अशा उपक्रमशील शाळेतील विद्यार्थांसाठी मी या शाळेत पुन्हा येऊन शाळेतील विद्यार्थांना मार्गदर्शन करील असे सांगितले . या प्रसंगी फेलोज विजय चोपडा, माजी विद्यार्थी सुनिल चांडक,दिलीप पारख,मुकुंद शहा , बाळासाहेब कवडे,कुणाल खरोटे,सचिन साळवे व इतर माजी विद्यार्थी तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक मनोहर बडगुजर ,पर्यवेक्षक मनोहर शिंदे शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

अजून बातम्या वाचा..

धन्यवाद मोदीजी अभियान : मनमाड  शहरातून  1500 पेक्षा जास्त लाभार्थी चे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आभार पत्रलेखन

धन्यवाद मोदीजी अभियान : मनमाड शहरातून 1500 पेक्षा जास्त लाभार्थी चे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आभार पत्रलेखन

महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे अभिनव संकल्पने तून सुरु असलेल्या...

read more
आज कार्तिकी एकादशी….शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये काकडा भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

आज कार्तिकी एकादशी….शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये काकडा भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड : ( योगेश म्हस्के)आज कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते , या...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे मध्य रेल्वेचे पी.सी.एम.एम.श्री.आर.एल.राणा(मुंबई) यांना निवेदन देण्यात आले

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे मध्य रेल्वेचे पी.सी.एम.एम.श्री.आर.एल.राणा(मुंबई) यांना निवेदन देण्यात आले

मध्य रेल्वे चे प्रधान मुख्य सामग्री प्रबंधक श्री.आर.एल.राणा (मुंबई) हे मनमाड वर्कशॉप ला भेट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]