नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे )
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील शेतकरी लक्ष्मण कोकाटे यांनी गेल्या २० वर्षापासून न्याय मिळत नसल्याने महसुल आयुक्त व जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडे इच्छा मरणाची परवानगी मागीतली आहे.
याबाबत वृत असे की महाराष्ट्र शासनाने नुकताच जाहीर केलेल्या “राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता ” सेवा पूर्ती पंधरवडा दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या अंतर्गत न्यायडोंगरी येथील एका पाटचारी संदर्भात जलसंधारण उप विभाग मालेगाव यांचे कडे गेल्या २० वर्षा पासुन प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निपटारा करण्यात यावा किंवा मला इच्छा मरणाची परवानगी तरी द्यावी अशा आशयाचे निवेदन येथील उद्विग्न झालेले शेतकरी शंकर लक्ष्मण कोकाटे यांनी नाशिक चे महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, कार्यकारी अभियंता व जलसंधारण नाशिक यांना दिले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की न्यायडोंगरी येथील देश नदीवर हिंगने देहरे रोड लगत सन १९७१ /७२ मध्ये पाझर तलाव बांधण्यात आला होता, त्याच तलावास सण २००२/२००३ मध्ये मृद व जलसंधारण उप विभाग मालेगाव याचे कार्यालया मार्फत पाट चारी (फिडर चॅनल ) बांधण्यात आली, सदर चारी तयार करताना श्री कोकाटे यांची पूर्व परवानगी न घेता त्याचे मालकीच्या शेती गट नंबर ८०१ मधून तयार करण्यात आली असून त्यामुळे कोकाटे यांचे गेल्या २० वर्षा पासुन खरीप हंगामातील शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे त्यांनी त्याचा कागदोपत्री लढा गेल्या २० वर्षा पासुन सातत्याने पाठपुरावा करून चालू ठेवला आहे परंतु ” सरकारी काम अन कित्येक वर्षे थांब “तरीही त्याची दखल घेतली जात नसल्याने उद्वेगाने त्यांनी टोकाची भुमिका घेत वरील आशयाचे निवेदन संबधितांना देऊन त्याच्या प्रती महाराष्ट्र शासनालाही पाठविण्यात आल्या आहेत त्या बरोबर सर्व पुरावे सादर करण्यात आले आहे. शिंदे +फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करून सेवा पूर्ती पंधरवडा जाहीर करून प्रलंबित कामांचा निपटारा करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्यातील जनतेला दिले आहे त्यालाच आवाहन देत कोकाटे यांनी इच्छा मरणाची परवानगी महसुल आयुक्ता कडे मागीतली आहे .












