loader image
[ays_poll id=7]

पोषण आहार मदतनिस यांच्या मानधनात वाढ करावी : आ. सुहास कांदे यांना मागणीचे निवेदन

Sep 21, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील विविध शाळामधुन पोषण आहार तयार करणाऱ्या मदतनीस सदस्याच्या मानधनात वाढ करावी यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्यामार्फत न्याय देण्यात यावा यासाठी आ. सुहास कांदे यांना संगीताताई सोनवणे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की आम्ही तालुक्यातील विविध शाळांमधुन मदतनीस म्हणून कार्य करतो . यात वर्गातील स्वच्छता,पोषण आहाराचे अन्न शिजवणे,अन्न वाटप करणे,भांडे धुणे,व पुन्हा वर्ग स्वच्छ करणे याबरोबरच इतरही कामे करतो.मात्र या मोबदल्यात आम्हाला अवघे १५०० रूपये महीना मानधन म्हणून दिले जाते.याच धर्तीवर अंगणवाडी सेविका,आशा स्वंयसेवीका,या देखील शासनाचे काम करतात मात्र त्यांना मोठया प्रमाणावर मानधन देण्यात येते . आम्ही व आमच्यासारख्या राज्यातील सर्वच शालेय पोषण आहार मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी पत्रात केली आहे.
आपण महाराष्ट्र राज्य सरकारमधील एक प्रमुख घटक आहात . म्हणून आपण मुख्यमंत्री ना . एकनाथजी शिदें यांच्या मार्फत आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी सरला मोढे, आशा काकळीज,वदंना बाहीकर, शोभा भोसले,नफीसा शेख आदी मदतनीस उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.