loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात शिक्षक पालक मेळावा संपन्न

Sep 21, 2022


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मनोगतातून डॉ.अरुण पाटील यांनी, पालकांनी आपला दैनंदिन कामातून वेळ काढून महाविद्यालयाला भेटी दिल्या पाहिजे यामुळे पालक आणि शिक्षक यांच्यात ऋणानुबंध तयार होऊन ते विद्यार्थ्यांच्या प्रगती आणि विकासासाठी प्रेरक ठरत असते असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी पालक प्रतिनिधी धर्मेंद्र वेताळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात होत असलेले विविध उपक्रमांची स्तुती केली. मनमाड परिसरात हिरे कुटुंबियांनी सुरू केलेल्या या महाविद्यालयामुळे मनमाड व शहर परिसरातील आर्थिक,सामाजिक जडणघडण व परिसराचा विकास एक वेगळ्याच उंचीवर पोहोचली त्याबद्दल हिरे कुटुंबियांचे ऋण मानावे तेवढे कमीच पडतील असे प्रतिपादन केले.कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे यांनी महाविद्यालयातील शिस्त,विद्यार्थ्यावर होत असलेले संस्कार यांचा एकत्रित परिणाम विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर होत असते असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.विठ्ठल फंड, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा.दीपक हिरे, प्रा.दीपक चव्हाण उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती योगिता शिंदे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दीपक हिरे तर आभार प्रदर्शन प्रा.पी. व्ही. अहिरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.