loader image
[ays_poll id=7]

माझ्या अभ्यासाचा संशोधन वृतीचा फायदा मी माझ्या नांदगावला देण्यासाठी सदैव तयार आहे – राष्ट्रीय संशोधक डॉ . ओमप्रकाश कुलकर्णी

Sep 21, 2022


नांदगांव सोमनाथ घोंगाणे

सततच्या औद्योगिक व व्यावसायिक दृष्ट्या मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदगाव तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय संशोधक डॉ ओमप्रकाश कुलकर्णी यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने पुढे जाण्याचा निर्णय नांदगाव येथील बैठकीत घेण्यात आला. येथील विश्रामगृहात आ. कांदे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील उद्योजक, व्यावसायिक व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठकीचे आयोजन उद्योगवर्धिनी नाशिकचे संचालक सुनील चांडक यांनी केले होते. याच भेटीत डॉ कुलकर्णी यांचा आमदार सुहास कांदे यांच्याहस्ते ह्रद्य सत्कार करण्यात आला.

यावेळी भौगोलिक, औद्योगिक व पारंपारिक शेती इत्यादी परिस्थितीचा अभ्यास करून नांदगाव तालुक्याच्या दृष्टीने छोट्यात छोट्या गटापासून सर्वांना रोजगार व व्यवसायाची संधी कशी प्राप्त होईल याचा विचार व अभ्यास करून आपल्याला व्यवसाय संधी उपलब्ध करून देता येतील याचवेळी नांदगाव तालुका शेती प्रधान असल्याने शेतीवर आधारित आधुनिक पिक पद्धती व त्या अनुषंगाने आवश्यक बदल कसे करता येतील याचा विचार आपणास करावा लागेल त्यासाठी मी माझ्या स्तरावरून डॉ कुलकर्णी यांना सर्वतोपरी सहाय व मदत करण्यास तयार आहे असे प्रतिपादन आ. कांदे यांनी केले.

नांदगाव माझी जन्मभूमी असून तिच्यासाठी आपण काही तरी करावे व या भावनेतूनच मी आज नांदगाव येथे आलो आहे असे भाव विवेशतेने मत मांडतांना डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले कि, माझ्या अभ्यासाचा संशोधन वृत्तीचा फायदा मी माझ्या नांदगावला देण्यासाठी सदैव तयार आहे. नांदगाव हे स्मार्ट सिटी करण्याचा आराखडा तयार असून तो मी नांदगावला देण्यास व त्यासाठी काम करण्यास हि तयार आहे. असे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले.

आमच्याकडे बचत गटाच्या एकूण ३००० पेक्षाही अधिक महिलांचे बचत गट कार्यरत असून त्यांच्यासाठी काही तरी करण्याची आपली व सौ. अंजुम कांदे यांची ईच्छा असून डॉ. कुलकर्णी व उद्योगवर्धीनीचे चांडक यांच्या संयुक्त उपस्थितीत लवकरच नांदगाव येथे एक भव्यदिव्य मेळाव्याचे आयोजन करून त्यात बचत गटाला व्यावसायिक संधी देऊन त्यांच्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेऊ असे आ. कांदे म्हणाले.

डॉ. कुलकर्णी यांनी कमी खर्चाचे व्यावसायिक तंत्रज्ञान द्यावे व उद्योग वर्धीनीचे सुनील चान्डक यांनी उत्पादनाचे मार्केटिंग यशस्वीरीत्या करून द्यावे अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी व्यापारी संघटनेचे विजय चोपडा, उद्योजक आनंद कासलीवाल व मुकुंद शहा, कृषी तज्ञ बाळासाहेब कवडे, दिलीप पारख, रत्नाकर खरोटे, विधिज्ञ सचिन साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.