loader image
[ays_poll id=7]

पोषण माह २०२२ अंतर्गत मनमाड येथील सर्व अंगणवाडी केंद्रांत “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन”–शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

Sep 22, 2022


एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत
अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग. आज स्वस्थ बालक स्पर्धा घेण्यात आली ..या कार्यक्रमास विभागातील नगरसेविका सुरेखा मोरे ,माजी नगरसेविका जया मौजेस साळवे, आशा सेविका छाया लोंढे ह्या सर्वजन उपस्थित होत्या. दिपप्रज्वल करुन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.. अंगणवाडी सेविका कल्पना जाधव यांनी स्वस्थ बालक स्पर्धे विषयी माहिती दिली.अंगणवाडी स्पर्धेतुन प्रथम दोन बालकांसाठी सुदृढ गुणवत्तेनुसार निवड करायची आहे त्यासाठी पुढील निकष आहे.१)मासिक वाढ संनियत्रण
२).बालकांची वैयक्तीक स्वच्छता ,तसेच अतिसार मुक्त बालक.
३). पोषण विषयक स्थिती -सातत्याने सर्वसाधारण वयोगट अथवा कमी वजनाच्या बालकातुन सर्वसाधारण गटात समावेश.
४).अ) गरम ताजा आहाराची उपलब्धता –
३ ते५ वयोगटातील बालकाची अंगणवाडीतील उपस्थिती.
४).ब)THR – ६ महिने. ते ३ व.वयोगटातील बालके.
५).नियमित लसिकरण.
६)जंतनाशक औषध
वरील निकषावरुन अंगणवाडी स्तरावर सर्वोच्च गुण मिळालेल्या दोन बालकांची निवड करुन कौतुक सोहळा साजरा करण्यात आला. यात विभागातील नोंदित बालकांसाठी हि स्पर्धा आयोजित करण्यात आली.. हे प्रमाणपत्र आईच्या तसेच बालकांच्या नावाने आहे.
३ ते ५ व.वयोगटातील पात्र एक बालकास तसेच ६ म.ते ३.व.वयोगटातील एक बालकास प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. महिला पालकांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. बालकांना प्रोत्साहन म्हणुन बक्षिसाचे वाटप करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.