नांदगाव सोमनाथ घोंगाणे
महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत असलेली राज्यातील नोंदणीकृत संघटना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य च्या नांदगाव तालुका अध्यक्षपदी जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन चे नांदगाव तालुकाध्यक्ष तथा जळगाव खुर्द ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री यशवंतराव रामकृष्ण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून नाशिक जिल्ह्यातून श्री जाधव यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुरुवातीपासून समाजसेवा व कुठल्याही कामात झोकून देण्याची आवड असलेल्या यशवंतराव जाधव यांनी नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आरूढ होताच विकासकामांचा धडाका उठविला.मात्र नाशिक जिल्ह्यातून सर्वप्रथम महावितरण व महापारेषण या वीज वितरण कंपन्यांना जळगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील मालमत्तेचा थकीत मालमत्ता व व्यवसाय कराची थकबाकी वसुलीची नोटीस बजावल्यावर श्री जाधव हे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कौतुकास पात्र ठरले. संपूर्ण नांदगाव तालुक्यातील नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंच यांनी याबाबत जाधव यांना या विषयाबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली असता समूह नेतृत्वाची आवड असलेल्या जाधव यांनी सर्वाना व्यवस्थित मार्गदर्शन केले.
सरपंच सेवा संघांचे प्रदेशाध्यक्ष श्री रोहित पवार यांनी ही बाब हेरली व सरपंच सेवा संघांचे संस्थापक श्री बाबासाहेब पावसे यांच्या पूर्व परवानगीने जळगाव खुर्द चे उपसरपंच श्री यशवंतराव जाधव यांची सरपंच सेवा संघाच्या नांदगाव तालुकाध्यक्ष म्हणून दोन वर्षासाठी नियुक्ती करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जळगाव खुर्द चे उपसरपंच व जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे नांदगाव तालुकाध्यक्ष म्हणून कार्य करत असताना कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या व नांदगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या गावात थोड्याच कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आणली तसेच शासनाच्या विविध विभाग लोकप्रतिनिधी यांचेकडे वारंवार पाठपुरावा करत जळगाव खुर्द येथे न भूतो न भविष्यती विकासकामे मंजूर करून आणली व तालुक्यातील सर्व नवोदित सरपंच उपसरपंच व सदस्यांना सुयोग्य मार्गदर्शनाची भूमिका याची दखल घेत सरपंच सेवा संघाने माझी सरपंच सेवा संघांचे नांदगाव तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याबद्दल मी सर्व वरिष्ठांचे आभार मानतो तसेच नांदगाव तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच व सदस्य यांना सरपंच सेवा संघांचे संस्थापक श्री बाबासाहेब पावसे यांच्या नेतृत्वात कार्यरत सरपंच सेवा संघाच्या झेंड्याखाली संघटित करून शासन दरबारीं येणाऱ्या अडचणीबाबत आवाज उठविण्याचा मानस श्री जाधव यांनी व्यक्त केला.












