loader image
[ays_poll id=7]

हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गाय ठार

Sep 22, 2022


मनमाड शहरापासून जवळच असलेल्या माळेगाव कर्यात मध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काल पहाटे शेतातल्या गोठ्यात बांधलेल्या गायीला गोठ्यातून ओढून घेऊन जाऊन आडबाजूला नेऊन ठार मारून अर्धवट खाल्ले आहे. शेतात व गोठ्याजवळ ठसे आढळून आल्याने बिबट्या की इतर हिंस्र श्वापद या चिंतेत ग्रामस्थ आहे. बिबट्याच्या चर्चेने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

माळेगाव कर्यात, नाराययणगाव, घाडगेवाडी हा भाग डोंगर झाडीचा भाग आहे त्यामुळे या भागात वन्य प्राण्यांचा राबता असतो आज या परिसरात चर्चेला उधाण आले होते बिबट्या आला बिबट्या आला. माळेगाव परीसरात आज पहाटेच्या वेळी रोशन पांडे या शेतकऱ्याच्या शेतातल्या गोठ्यात जनावरे बांधलेले होते आज पहाटे या गोठ्यातून एका गायीला ओढत नेऊन शेतापासून लांब अंतरावर ही गाय मारून मागच्या पायाच्या बाजूला अर्धवट खाल्ली आहे. सकाळी श्री पांडे हे गोठ्यात जनावरांकडे गेले असता त्यांना बांधलेली गाय दिसली नाही त्यामुळे गाय सुटली की काय या शंकेने त्यांनी शेतात फिरून पाहिले मात्र शेतात फिरत असताना त्यांना बिबट्या सदृश्य प्राण्याचे पायाचे ठसे आढळून आल्यामुळे त्यांचा संशय अधिक बळावला गाय मारली गेली की काय अशी शंका आली असता त्यांनी अधिक फिरून पाहिले असता शेताच्या काही अंतरावर दाट झाडीत गाय मरून पडलेली होती तर गायीच्या मागील पायाच्या बाजूने अर्धवट खाल्लेली दिसली त्यामुळे आपली गाय बिबट्यानेच मारली असावी असा अंदाज बांधला जात आहे गाय मारल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली गेली आणि एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावात बिबट्या आला आहे की इतर श्वापद आहे याची माहिती मिळत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे मात्र श्री पांडे यांच्या शेतात तसेच गारा केलेल्या ठिकाणी पावटे आढळून आले असून गाय अर्धवट खालेली असल्याने नक्कीच बिबट्या असावा असेही बोलले जात आहे या अगोदरही या गावात एक घोडी, एक घोडा आणि वासराला फस्त केल्याची घटना घडली आहे. या भागात अनेक हिंस्र प्राणी असून या प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. हल्ला केलेल्या ठिकाणी ठसे मिळून आले असून वनविभागाने तातडीने या ठिकाणी पंचनामा करून ठसे कोणाचे आहे याची खातरजमा करण्यासाठी वनविभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन हल्ला केलेला प्राणी नेमका कोण याची ओळख पटवावी जेणेकरून ग्रामस्थांमध्ये असलेले भीतीचे वातावरण राहणार नाही आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.