loader image
[ays_poll id=7]

मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपर फास्ट एक्स्प्रेस ला जानेवारी पर्यंत मुदतवाढ

Sep 22, 2022

सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – मनमाड उन्हाळी विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीला १ ऑक्टोबर ते पाच जानेवारी २०२३ पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.यामुळे चाकरमाने,विद्यार्थी आणि व्यावसायीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गाडी क्रमांक ०२१०२ मनमाड मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गाडी क्रमांक ०२१०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मनमाड ही गाडी आता एक ऑक्टोबर पासून पाच जानेवारी २०२३ पर्यंत दररोज तिच्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे.

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन सुरुवातीला तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर मनमाड – कुर्ला गोदावरी एक्सप्रेसच्या धर्तीवर मनमाड – मुंबई – मनमाड समर एक्सप्रेस सुरू करण्यात आली. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन पुन्हा तिसऱ्यांदा या गाडीला मुदतवाढ देण्यात आली असून ही गाडी आता पाच जानेवारी २०२३ पर्यंत मनमाड मुंबई मनमाड दररोज धावणार आहे. या गाडीच्या एकूण ९७ फेऱ्या या कालावधीत होतील.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.