loader image
[ays_poll id=7]

वेदांत प्रकल्प : नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्य सरकारचा निषेध

Sep 23, 2022


नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा तळेगाव येथील प्रस्तावित सेमी कंडक्टर व डिस्प्ले फेब्रीकेशनचा मंजूर प्रकल्प गुजरात राज्यात वळविल्याने या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले.

नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वेदांत व फॉक्सकॉन कंपनीने मंजूर केलेल्या प्रकल्पासाठी पुन्हा महाराष्ट्रात वळविण्यात यावा व राज्यातील युवकांच्या हक्काचा रोजगार प्रश्न सोडवा यासाठी नांदगाव तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात आले. मनमाड कार्याध्यक्ष नाना शिंदे, रामु दादा, महिला तालुका अध्यक्ष योगिता पाटील, प्रबोधन मंचाचे जगताप सर, सोपान पवार, तालुका अध्यक्ष विजय पाटील शिंदे – फडणवीस सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. सेमीकंडक्टर प्रकल्प पून्हा महाराष्ट्रात आणावा, न आणल्यास नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व माजी. आमदार पंकज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी दिला. नांदगाव तालुक्यात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सर्व पिकांची पाहणी , पंचनामे करून एकरी ५००००₹ मदत जाहीर व लम्पी रोगामुळे शेतकऱ्यांचे मेलेल्या जनावरांची शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी . उर्वरित पशू जनावरांना मोफत लसीकरण करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन नांदगाव तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

या धरणे आंदोलनात तालुका अध्यक्ष विजय पाटील, शहरप्रमुख बाळकाका कलंत्री, प्रतापदादा गरूड, रामु दादा पवार, डॉ. वाय . पी. जाधव, महिला तालुका अध्यक्ष योगिता पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष राजेंद्र लाठे , गट प्रमुख राजेंद्र सावंत, गट प्रमुख दादाभाऊ पगार, युवक प्रमुख गौतम जगताप, नानाभाऊ शिंदे, राजभाऊ जाधव, हबित शेख, अक्षय देशमुख, आनंद बोथरा , पंडित सुर्यवंशी, किसनराव जगधने, राजेंद्र निकम, वाल्मिक खिरडकर, काशीनाथ जोघारे , योगेश बोरसे, शिवा सोनवणे, अलका आयनोर, सुगंधा खैरनार, बाळासाहेब देहाडराय, प्रकाश देवरे, साईनाथ शिरसाट , काका सोळसे , वाल्मिक जगताप , विश्वास आहिरे, दत्तु पवार, नारायण पवार, संजय आहेर, पद्माकर महानुभाव, शिवाजी जाधव, दिलीप निकम , सचिन कोरडे, दिगंबर पाटील, देविदास पगार, देवदत्त सोनवणे, दिपक खैरणार, दया जुन्नरे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.