loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – नांदगाव नगरपालिकेचे दहेगाव धरण १००% भरले

Sep 23, 2022


 

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगांव नगरपालिकेचे पाणी पुरवठा योजनेचे दहेगांव धरण आज दि. २३/९/२०२२ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता पुर्ण क्षमतेने भरून सांडवा प्रवाहीत झाला आहे.

दहेगांव धरणाची साठवण क्षमता ७३.०० दशलक्ष घनफुट असून सन २००९ नंतर ११ वर्षानंतर दि.३०/९/२०२० , दि.८/९/२१ व दि. २३/९/२०२२ असे सलग तीन वर्ष सदरचे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
सन २००९ नंतर ११ वर्षानंतर सलग तीन वर्ष सप्टेबंर महिन्यात हे धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. दहेगाव धरण पुर्ण क्षमतेने भरलेनंतर नांदगाव शहराला किमान २ ते ३ वर्ष सदर पाणी पुरते हे धरण भरल्याने नांदगाव कराचीं पाणी पुरवठयाची चिंता मिटली आहे. आज तरी नांदगाव शहराला याच धरणातून पाणी पुरवठा होत आहे. या धरणातून पाणी पुरवठा होतांना नगरपालिकेची पाणी शुद्वीकरण्याची कुठलीही यंत्रणा नाही फक्त तुरटी व टी. सी. एल पावडर टाकून पाणी पुरवठा केला जातो .

॥धरण भरले पण नांदगाव वासीय तहानलेले ॥

दहेगाव धरण १००% भरले गिरणा धरण १०० % भरले माणिकपुंज धरण १००% भरले पण नांदगाव करानां आजही ८ ते १० दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातो . नांदगाव न. पा . चे सुस्त प्रशासन याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा नांदगाव कर करीत आहे.

नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी अत्याधुनीक पाणी शुद्वीकरण यंत्रणा बसविणे साठी लवकरात लवकर प्रयत्न करावे अशी मागणी नांदगावकर करीत आहे.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.