मनमाड शहर शिवसेना कोअर कमिटी सदस्यांची बैठक आज शुक्रवार रोजी येथील आमदार कांदे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली.या बैठकीत शहरातील नागरिकांच्या महत्वाच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. मनमाड शहरातील प्रमुख पाणीप्रश्न सोडवल्यामुळे शहरातील जनतेचा आपण विश्वास संपादन केलेला आहे, याबद्दल मनमाडकर जनता कृतज्ञ आहे आणि मनमाडकर जनतेला आपल्याकडून शहराच्या इतरही विकास कामांची पूर्तता व्हावी अशी अपेक्षा सर्वच स्तरावरून होत आहे आणि आमदार कांदेच त्या सोडवू शकतात असा विश्वासही निर्माण झाला आहे. आणि म्हणूनच आमदार कांदे यांच्या माध्यमातून मनमाड शहरातील प्रमुख प्रलंबित समस्या लवकरात लवकर सोडविला जाव्या अशा अपेक्षा जनता करत आहेत.
मनमाड शहर शिवसेना कोअर कमिटी सदस्यांनी शहरातील प्रमुख भागांमध्ये भेटी देऊन सर्व समस्या जाणून घेतल्या असून हे सर्व प्रश्न व अडचणी कोअर कमिटी च्या वतीने आमदार कांदे यांच्या निदर्शनास आणून दिल्या व त्वरित आमदार कांदे प्रलंबित असलेली विकास कामे तसेच अडी अडचणी सोडवतील.
मनमाड शहरातील प्रमुख समस्या खालीलप्रमाणे :-
१. मालेगाव – नगर हायवे हा रस्ता मनमाड शहरातून जात असता बरेच अपघात होऊन लोकांची जीवितहानी झाली आहे. त्याकारणाने हा शहरातून जाणारा रस्ता शहराबाहेरून बायपास करण्यात यावे.
२. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा.
तसेच शहरातील महापुरुषांचे पुतळे सुशोभीकरण करण्यात यावे.
३. मनमाड शहरातील बेरोजगारी प्रश्न दिवसें दिवस वाढत असल्या कारणाने तरुण/तरुणींना नोकऱ्या नाही, त्या संदर्भात मनमाडकरांची बर्याच दिवसांची मागणी मनमाड मध्ये एम.आय.डी.सी मंजूर करण्यात यावी.
४. मनमाड येथे विधार्थी उच्च शिक्षणाकरिता बाहेरगावी जावे लागते यामुळे आपल्या मनमाड शहरात इंजिनियरिंग व मेडीकल कॉलेजची स्थापना करावी.
५. नांदगाव येथील नियोजित शिवश्रुष्टी प्रमाणे मनमाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य-दिव्य स्मारकाचे उभारणी करावी.
६. मनमाड शहरातील नागरिकांसाठी मनोरंजनाचे साधन नसल्याकारणाने अत्त्यआधुनिक नाट्यगृहाचे निर्मिती करावी.
७. मनमाड येथे असलेले भगवान महर्षी वाल्मिकी स्टेडियम येथे इनडोअर-आउट डोअर गेम चालू करण्याकरिता व विविध खेळ खेळ्याकरिता त्या वास्तुला अत्याधुनिक करावी.
८. शहरातील गौतम नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग या वास्तुंचे सुशोभीकरण करणे.
९. दशक्रिया विधीसाठी ‘रामगुळणा/पांझन नदी पात्रावर सुंदर घाट बनवून शुशोभीकरण करणे.
१०. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे I.C.U ची सुविधा उपलब्ध करुण देणे.
११. मनमाड शहरातील राखीव असलेल्या जागेवर बगीचा निर्मिती करुण लहान मुलांकरिता खेलेय साहित्य उपलब्ध करुण देणे.
१२. मनमाड मधील विविध चौकांत सर्कल तयार करुण दिशा दर्शक फलक तसेच रोषणाई स्मारक बनवणे.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











