मनमाड – शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांचा वाढदिवस बुधलवाडी येथे गणेशभाऊ धात्रक मित्र मंडळाच्यावतीने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. बुधलवाडीच्या क्रांतीवीर वसंतराव नाईक न.प. शाळा क्रमांक 11 मध्ये गणेश भाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आले.तर लोकसहभागातून घेण्यात आलेल्या संगणकाच्या मॉनिटर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक प्रकाश गोरे,यांच्या स्वाधीन करण्यात आले.यावेळी शिवसेना शहर उपप्रमुख अशोक सानप , शहर संघटक राजाभाऊ पवार, पत्रकार निलेश वाघ,सचिन कराड,रामभाऊ सांगळे, अरविंद घुगे, राजू सांगळे , विनोद बोडके, राजू सांगळे ( भगत ),धनंजय सानप, प्रमोद सानप ,अविनाश बोडके,रोहित सांगळे, तुषार इप्पर आदी उपस्थित होते.उपशिक्षक नितीन कोल्हे व वंदना साखरे यांनी संयोजन केले.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











