मनमाड 🙁 योगेश म्हस्के) हिंदु धर्मामध्ये मोठ्या भक्ती-भावाने साजरा करण्यात येणारा देवीमातेचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव…
या उत्सवामध्ये नऊ दिवस भाविक भक्त हे देवीचा जागर करून ,उपवास करून मोठ्या आनंदात नवरात्र उत्सव साजरा करत असतात.अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या नवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी लागणारे पुजेचे साहित्य ,घट , देवीची मुर्ती इत्यादी वस्तुंची दुकाने शहरातील बाजारपेठेत लागली असुन नागरिक नवरात्री साठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करत आहे , नवरात्रीसाठी लागणाऱ्या सर्व पुजेच्या साहित्यांची दुकाने बाजारपेठेत सजलेली आहे.
शहरातील सर्व देवी मंदिरे आणि सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांची देखील उत्सवाची तयारी अंतिम टप्यात असुन विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येऊन यंदाच्या वर्षीच्या नवरात्री उत्सव मोठ्या भक्ती-भावाने आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.













