loader image
[ays_poll id=7]

माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक यांचे उद्यापासून स्मशानभूमीत धरणे आंदोलन

Sep 25, 2022

शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष,नगरसेवक तथा विद्यमान सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक हे सोमवार दि.२६/९/२०२२ रोजी मनमाड स्मशानभूमीत धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.आपल्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याबाबात उच्चस्तरीय (सी.बी आय.) चौकशी करण्यात यावी ह्या मागणीसाठी नाईक हे आजपासून धरणे आंदोलन करणार आहेत. आपले शेत हे रेल्वे रुळाच्या बाजूला असून अधूनमधून होणाऱ्या रेल्वे अपघाताचे वेळी अपघातग्रस्तांना औषधोपचार व मृतांना हॉस्पिटल मध्ये मी सदैव मदत करीत आलेलो आहे. दि. २/९/२०२२ रोजी शेतातून घरी येण्यास निघालो असता रुळा समीप उभ्या असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी बोलावून फोन वर माहिती देण्यास सांगितले.आपण मनमाड पो.ठाण्याचे ए.पी.आय.गीते यांना फोन करून माहिती दिली त्याचवेळी तेथे एक आर. पी.एफ आले असता त्यास ए.पी.आय.गीते यांच्यासोबत बोलण्यास सांगितले त्यांनी गीते यांच्याशी बोलण्यास नकार दिला असता मी तेथून घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी कळाले की माझ्याविरुद्ध ३५३ चा गुन्हा नोंदविण्यात आला . वकिलां च्या सूचनेवरून गुन्ह्याची नक्कल मिळविली असता त्यात माझ्यावर घाणेरड्या भाषेत खोटे आरोप केल्याचे निदर्शनास आले. ए.पी.आय. गीते यांचे वडील वारल्याने त्यांच्याशी संपर्क करू शकलो नाही. सदर खोट्या गुन्ह्याची उच्चस्तरीय (सी.बी.आय.) चौकशी व्हावी म्हणून आपण सोमवार पासून स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करणार असून तद्नंतर ही न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रवीण नाईक यांनी दिला असून सर्व परिणामांची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहील असे ही निवेदनात म्हटले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.