सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा व ओपन लाईन शाखेतर्फे रेल्वे कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी उम्मीद कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी मनमाड शहरातील रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी जेष्ठ नागरिक व रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. यावेळेस उम्मीद कार्ड संदर्भात रजिस्ट्रेशन करून सबमिशन करण्यात आले व त्यांच्या मेडिकल कार्ड संबंधीच्या समस्या जाणून निवारण या ठिकाणी करण्यात आले व याप्रसंगी शाखेचे चेअरमन प्रकाश बोडके, सेक्रेटरी नितीन पवार,वर्किंग चेअरमन महेंद्र चौतमल, खजिनदार मुक्तार शेख,तसेच ओपन लाईनचे चेअरमन आनंद गांगुर्डे, सेक्रेटरी मोहम्मद इरफान,नाना भालेराव, सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ संसारे, युवा चेअरमन दिपक जाधव, गणेश हाडपे प्रीतम मंत्री वर्किंग चेअरमन अरुण कलवर, युवा चेअरमन वैभव कापडे,जमिल शेख, अक्षय माकुने,शिवाजी जाधव,हेमंत सांगळे,प्रशांत ठोके, सुनील शिंदे, नंदू कदम, गिरीश पाटील, अजहर तांबोळी,संदीप पाटील, गफ्फर सय्यद,दत्तू बत्तीशे, हेमंत माळी,प्रवीण भालेराव, अनिल केदार आदी उपस्थित होते.
प्रकृती स्कूलचा दिवाळीचा अनोखा आनंदोत्सव पोलिस बांधवांसोबत
दिवाळी हा आनंद, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा सण. या वर्षाची दिवाळी वेगळ्या पद्धतीने...











