नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव तालुक्यातील शिधापत्रिका (रेशनकार्ड ) धारकांनी आपल्या रेशनकार्ड मधील सदस्यांचे ई.के.वाय.सी करून घेण्याचे आवाहन तहसिलदार डॉ. सिद्घार्थ मोरे व नायब तहसिलदार (प्रशासन ) श्री प्रमोद मोरे यांनी केले.


याबाबत अधिक वृत असे की नांदगाव तालुक्यात एकून १५६ स्वस्त धान्य दुकाने असून या दुकाना मार्फत स्वस्त धान्य वाटप केले जाते या धान्य दुकानामधील रेशनकार्ड धारक ग्राहकांनी आपले शिधापत्रिके वरील सदस्यांचे पॉस मशीन वर नाव आहे. परंतु आधार नंबर नाही .अशा व्यक्तीने आपले आधारकार्ड दुकानदारा कडे नेऊन आपला आधार नंबर पॉस मशीन वर नोंदवून पॉस मशीन वर थंब देऊन आपले ई.के .वाय .सी करूण घेणे . तसेच आपल्या शिधापत्रिके वरील एखादी व्यक्ती मयत असेल तर त्या व्यक्तीचे नाव पॉस मशीन वरून त्वरीत दुकानदाराला कमी करण्यास सांगावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नांदगाव तालुक्याचे तहसिलदार डॉ. सिद्वार्थ मोरे व नायब तहसिलदार ( प्रशासन ) श्री प्रमोद मोरे यांनी जनतेला केले आहे.












