loader image
[ays_poll id=7]

नांदगाव बाजार समितीच्या न्यायडोंगरी उपबाजार आवारात प्रचंड गैरसोय

Sep 26, 2022


न्यायडोंगरी (जगननाना पाटील)

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार न्यायडोंगरी येथे बाजार समिती प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पशुपालकांचे अतोनात हाल होत आहे.
याबाबत अधीक माहीती अशी की नांदगाव बाजार समितीचे न्यायडोंगरी येथे उपबाजार आवार आहे . या ठिकाणी असलेल्या आवारात प्रचंड घाण असून मोठया प्रमाणावर गवत वाढले आहे . नागरीक याठिकाणी उघड्यावर शौचालयाला बसत असतात . तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी न्यायडोंगरी परिसरातील शेतकरी वर्ग व व्यापारी वर्ग यांचे कडून केली जात आहे . सोमवार हा न्यायडोंगरी येथील आठवडे बाजाराचा वार या दिवशी परिसरातील असंख्य जनावरे त्यात प्रामुख्याने बैल, गाई, बकऱ्या, मेंढ्या त्याचबरोबर पक्षी वर्गात कोंबड्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतात परंतु बाजार समितीच्या आवारात कुठलीही व्यवस्था नसल्याने नाईलाजाने पशुपालकांना विक्रीसाठी आणलेले जनावरे हे रोडवर म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 जेथे भरधाव वाहनांची वर्दळ असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर उभे करून बाजार भरवावा लागतो याबाबत नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत न्यायडोंगरीकरांनी आवाज उठवून सोयी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केलेली आहे .यापूर्वीच्या संचालक मंडळाकडे अनेक वेळा मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले परंतु सध्या प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासक साहेबांनी यात विशेष लक्ष घालून ही दुरावस्था कायमस्वरूपी दूर करावी अशी मागणी परिसरातील पशुपालक व व्यापाऱ्यांकडून होत असून त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

 


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.