loader image
[ays_poll id=7]

विद्यार्थी ३०२ अन् शिकवण्यासाठी शिक्षक फक्त ३

Sep 26, 2022

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील बोलठाण जिल्हा परिषद शाळेत एकूण ८ शिक्षक होते.आंतरजिल्हा बदलीने मूळ ४ शिक्षकांची बदली झाल्याने व १ शिक्षक अगोदरच बदली होवून गेल्याने बोलठाण जिल्हा परिषद शाळेत ३०२ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी फक्त ३ शिक्षक आहे.मुळात शाळेत पहिले ८ होते .आंतरजिल्हा बदली ने ४ व अगोदर १ शिक्षक बदलून गेल्याने असे एकूण ५ शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक चिंतेत आहे.
बोलठाण जिल्हा परिषद शाळा ही घाटमाथ्यावरील मोठी शाळा असून विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे.४० विद्यार्थ्यांना १ शिक्षक या प्रमाणे ९ शिक्षक व १ हेडमास्तर असे एकूण १० शिक्षक आवश्यक असतांना आज रोजी फक्त ३ शिक्षक व १ हेडमास्तर आहे.पर्यायाने विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे.एकावेळी ४ शिक्षक बदली झाल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.शिक्षक तात्काळ मिळावे यासाठी शालेय व्यवस्थापन समिती तर्फे मुख्याध्यापक यांना निवेदन ही देण्यात आले आहे.
बोलठाण जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी वर्ग असून प्रत्येक वर्गच्या २ तुकड्या होऊन ८ वर्ग होतात.शाळेचा शैक्षणिक दर्जा ही उत्तम असल्याने पालक वर्ग मुलांच्या प्रवेशासाठी आग्रही असतात.गेल्या १ महिन्यापासून शिक्षक बदली झाल्यापासून अजून पर्यंत शिक्षक नसल्याने पालक वर्गात संताप दिसून येतो. तरी शासनाने तात्काळ शिक्षक देऊन होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी पालक करत आहे.

प्रतिक्रिया
प्रितेश नहार
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष

आधीच कोरोना मुळे मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झालेले आहे आत्ता कुठं शैक्षणिक घडी बसण्यास सुरवात झाली होती त्यात शिक्षक बदली मूळ पुन्हा मुलांचे नुकसान होत आहे याकडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ शिक्षक दयावे व शैक्षणिक नुकसान टाळावे.

अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
.