loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो: प्रा. सुरेश नारायणे

Sep 27, 2022


सोमनाथ घोंगाणे

नांदगाव
येथील मविप्र संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा झाला.व राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाचे प्रमुख पाहुणेंच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजनेत सक्रिय असणारे विद्यार्थी स्वावलंबी, शिस्तप्रिय, व सामाजिक बांधिलकी जपणारे असतात त्यांच्याकडे सामाजिक भान असते. आणि संवेदनाशील असल्यामुळे ते खऱ्या अर्थाने एक सर्व गुणसंपन्न असणारे त्यांचे व्यक्तिमत्व बनते असे प्रतिपादन प्रा. सुरेश नारायणे यांनी केले ते येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून मविप्र संस्थेचे नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे (पाटील) होते,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. एन. शिंदे होते .प्रा. सुरेश नारायणे यांनी राष्ट्रीय सेवा दिनाचे महत्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या विद्यार्थी दशेपासून ते राष्ट्रीय सेवा योजनेचे एक अधिकारीपदा पर्यंतचे अनुभव विद्यार्थ्यां समोर मांडले .एनएसएस मधील विद्यार्थ्यांना समाजात एक वेगळा ठसा उमटत असतो. समाजाच्या अनेक विधायक उपक्रमात स्वयंसेवक नेहमी अग्रणी राहत असतो.त्यामुळे स्वयंसेवकांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये एनएसएसच्या कामांमध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रा.सुरेश नारायणे यांनी यावेळी केले. तसेच प्रा. डॉ. पी.टी निकम यांनी विद्यार्थ्यांना एन.एस.एसच्या इतिहासाबद्दल माहिती सांगितली. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कशी व कधी स्थापन झाली याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपलं व्यक्तिमत्व घडावे असे विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले. नांदगाव महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. एस.ए.मराठे, डॉ. ए. बी. सोनवणे, डॉ. बी .डब्ल्यू. चवरे, डॉ. एम. पी. दुशिंग, प्राध्यापिका.एस. एस.शिंदे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्वी गीते या विद्यार्थिनीने केले. ज्ञानेश्वर गीते या स्वयंसेवकाने आभार मानले तर राष्ट्रीय सेवा योजना या दिवसाच्या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. बालाजी मोरे प्रा. संदीप दौंड व प्राध्यापिका कौशल्या बागुल यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.