loader image
[ays_poll id=7]

दहिवळ सह २५ गाव पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा नामदार भुसे यांच्या हस्ते संपन्न

Sep 28, 2022


नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे तसेच आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत दहिवळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन काल नांदगाव विधानसभा मतदारसंघातील दहिवळ ता. मालेगांव येथे संपन्न झाला. या वेळी कळवाडी जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. दहिवाळ सह २५ गाव पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित होत असल्याने आमदार सुहास आण्णा कांदे यांचे उपस्थित नागरिकांनी आभार मानले
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदारसंघात करंजवण मनमाड पाणी योजना, 78 खेडी पाणी योजना आणि दहिवळ पाणी योजना मंजूर करत घरा घरात पाणी पोहचण्याचे अतिशय पुण्याचे काम हाती घेतले असल्याचे कौतुक नाशिक जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी केले.

याप्रसंगी बोलताना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी कळवाडी गटातील नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला आमदार केले आहे मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत आपले हे उपकार विसरणार नाहीत आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी मी निरंतर प्रयत्न करीत राहील असा विश्वास बोलून दाखवला.
या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी परिसरातील मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.
या कार्यक्रमासाठी नांदगाव मतदारसंघ व मालेगाव कळवाडी गटातील सर्व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवा सेनेचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.