अग्रवाल समाजाचे दैवत व अग्रकुल प्रवर्तक महाराजा अग्रसेन जी यांची 5148 वी जयंती नवरात्री चे प्रथम दिवशी मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात श्री बालाजी मंदिर येथे साजरी करण्यात आली.महाराजा अग्रसेन यांचे जयंती निमित्त मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्ता व अग्रवाल समाजातील जेष्ठ सदस्य श्री भगवानदास अग्रवाल यांचे आजादी का अमृत महोत्सवा निमित्ताने मनमाड अग्रवाल महिला मंडळ तर्फे व गिरिश व सोनु बंसल बंधु तर्फे शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच अग्रवाल समाजातील सन 2021-22 ह्या शैक्षणिक वर्षात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले . जयंती निमित्त रंगारंग कार्यक्रमात महाराजा अग्रसेन व त्यांची पत्नी माता माधवी यांचे स्वरूप दर्शविण्यासाठी चि.कार्तिक संतोष अग्रवाल व कु. फाल्गुनी देविप्रसाद अग्रवाल यांनी अत्यंत सुंदर अशी वेशभूषा केली व रोहन रमेश अग्रवाल ह्यांनी धार्मिक गाणी सादर करून कार्यक्रमात रंगत वाढविली. कार्यक्रमाचे संयोजन मनमाड अग्रवाल महिला मंडळ तर्फे सौ.पिंकी अग्रवाल, सौ.पुष्पा बन्सल, कुशल अग्रवाल, सौ.रेखा बन्सल, सौ.मनिषा अग्रवाल, ममता अग्रवाल व सौ.सावा, सौ.किर्ती अग्रवाल, लक्ष्मी अग्रवाल व सोनिया अग्रवाल ह्यांनी केले, कार्यक्रमास श्रीकांत अग्रवाल, सूर्यकांत अग्रवाल, हेमंत अग्रवाल, बबलु बन्सल,गिरीश बंसल व सोनु बन्सल,बसत बंधु, विनोद सावा,अशोक अग्रवाल , गणेश अग्रवाल व अग्रवाल समाजातील सर्व बंधु भगिनी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. रमेश बी अग्रवाल यांनी केले.














