नवरात्री उत्सवाचे खरे व्रत
स्वच्छ करू अवघे भारत
पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी तसेच प्लास्टिक पिशव्यांएवजी कापडी पिशव्यांचा वापर नागरिकांनी, माता भगिनींनी करावा असे आवाहन इनर व्हील क्लब ऑफ मनमाड च्या पदाधिकारी आणि सदस्यांनी विविध मंदिर परिसर, गोदावरी माता मंदिर,महालक्ष्मी मंदिर ,भाजी बाजार ,ह्या सार्वजनिक ठिकाणी इनर व्हील क्लब ऑफ मनमाड च्या पदाधिकारी आणि सदस्यांनी प्रत्यक्ष जाऊन जनजागृती प्लास्टिक बंदी ,प्लास्टिक चा वापर टाळावा व कापडी पिशव्या विक्रेत्यांना व भक्तगण भाविक ,ग्राहकांना वाटून पर्यावरण वाचवा हा संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न केला व यापुढे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक टाळा असे आवाहन अध्यक्षा सौ. कीर्ती मकवाने, सचिव सौ. कविता राका, खजिनदार सौ.ज्योती मुनोत व संस्थापक अध्यक्षा सौ.सुमित्रा ललवाणी यांसह सर्व महिला सदस्यांनी प्रयत्न केले.
















