मनमाड :- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान हे अभियान सुरू करण्यात आले आहे.या अंतर्गत गरोदर माता व १८ वर्षावरील महिलांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार आहे.तपासणी व उपचार मोफत असल्याने याचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले नांदगांव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष जगताप यांनी केले आहे.येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.
पानेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात गांवातील महिला,तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी डॉ.जगताप यांनी या अभियानाची रुपरेषा सांगताना आरोग्य अधिकारी म्हणाले की,सुरक्षित मातृत्व सर्वांची जबाबदारी असून गरोदरपण ही बाब आहे.त्यासाठी खास सुरक्षित मातृत्वाचा विश्वास देणार आहे.मुलीच्या जन्माचे स्वागत घराघरात केले जाईल. यावेळी आईचा संपूर्ण स्नेह कार्यक्रम केला जाईल.तर गरोदर मातेची काळजी देखील घेण्यात येईल.त्यासाठी शासकीय रुग्णालयात प्रसुती करून सुरक्षित बाळाला जन्म द्यावा.तसेच जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळेल.
त्यामुळे सुरक्षित मातृत्व अभियान या सर्व आरोग्य विषयक बाबींवर भर देऊन अभियान राबविण्यात येणार असल्याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी महिला,गरोदर माता यांची आरोग्य विषयक तपासणी करण्यात आली.याप्रसंगी आरोग्य सहाय्यक श्रीमती संगीता बागुल,आरोग्य सेविका शिवनंदा केदारे,प्रयोगशाळा तंत्रज्ञ संजीवनी पाटील,वैद्यकीय अधिकारी विनया बोरसे आदिसह आरोग्य विभागाचे कर्मचारी वर्गासह अंगणवाडी सेविका मंगला सांगळे,मंगला सानप, प्रमिला उंबरे,अनिता आव्हाड, मदतनीस कमल गंभीरे,सीना आंधळे,आशासेविका योगिता सांगळे,दिपाली आव्हाड आदीसह गावातील महिला तरुणी उपस्थित होत्या.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











