loader image
[ays_poll id=7]

माता सुरक्षित – घर सुरक्षित अभियान : महिलांची होणार मोफत आरोग्य तपासणी व उपचार – डॉ.सुभाष जगताप

Sep 29, 2022


मनमाड :- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान हे अभियान सुरू करण्यात आले आहे.या अंतर्गत गरोदर माता व १८ वर्षावरील महिलांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार आहे.तपासणी व उपचार मोफत असल्याने याचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले नांदगांव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष जगताप यांनी केले आहे.येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.
पानेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात गांवातील महिला,तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी डॉ.जगताप यांनी या अभियानाची रुपरेषा सांगताना आरोग्य अधिकारी म्हणाले की,सुरक्षित मातृत्व सर्वांची जबाबदारी असून गरोदरपण ही बाब आहे.त्यासाठी खास सुरक्षित मातृत्वाचा विश्वास देणार आहे.मुलीच्या जन्माचे स्वागत घराघरात केले जाईल. यावेळी आईचा संपूर्ण स्नेह कार्यक्रम केला जाईल.तर गरोदर मातेची काळजी देखील घेण्यात येईल.त्यासाठी शासकीय रुग्णालयात प्रसुती करून सुरक्षित बाळाला जन्म द्यावा.तसेच जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळेल.
त्यामुळे सुरक्षित मातृत्व अभियान या सर्व आरोग्य विषयक बाबींवर भर देऊन अभियान राबविण्यात येणार असल्याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी महिला,गरोदर माता यांची आरोग्य विषयक तपासणी करण्यात आली.याप्रसंगी आरोग्य सहाय्यक श्रीमती संगीता बागुल,आरोग्य सेविका शिवनंदा केदारे,प्रयोगशाळा तंत्रज्ञ संजीवनी पाटील,वैद्यकीय अधिकारी विनया बोरसे आदिसह आरोग्य विभागाचे कर्मचारी वर्गासह अंगणवाडी सेविका मंगला सांगळे,मंगला सानप, प्रमिला उंबरे,अनिता आव्हाड, मदतनीस कमल गंभीरे,सीना आंधळे,आशासेविका योगिता सांगळे,दिपाली आव्हाड आदीसह गावातील महिला तरुणी उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.