loader image
[ays_poll id=7]

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांकडे वळावे- डॉ. सिद्धार्थ मोरे

Sep 29, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा आणि प्लेसमेंट विभागांतर्गत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून या व्याख्यानमालेचे उद्घाटनप्रसंगी नांदगाव तालुक्याचे तहसिलदार डॉ. सिद्धार्थ मोरे हे उद्घाटक आणि प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना राज्यसेवा, लोकसेवा, पोलिस निरीक्षक, बँकिंग, वनविभाग, ग्रामविकास विभाग अशा अनेक विभागांकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांना स्व- अनुभव सांगताना विविध उपयुक्त पुस्तके, टीव्ही चॅनल, साप्ताहिके याची माहिती दिली. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान विद्यार्थ्यांशी ही संवाद साधला तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे दिली. आपल्या भाषणातून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्याची क्षमता असते त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये वळावे असे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन. शिंदे यांनी उदाहरणावरून स्पर्धा परीक्षा किती महत्त्वाचे आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी या परीक्षा यशस्वीरित्या पास होऊ शकतात असा विश्वास दिला तसेच यासाठी अथक परिश्रम करण्याची तयारी आणि आत्मविश्वास बाळगावा असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्पर्धा परीक्षा आणि प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्राध्यापक एम बी आटोळे यांनी विद्यार्थ्यांना विभागांतर्गत येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली तसेच या व्याख्यानमालेमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध व्याख्यानांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सर्व व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आव्हान समन्वयक तसेच प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आटोळे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉ. एम.पी. दुशिंग यांनी केले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय मराठे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. भागवत चवरे, आयक्यूएसी प्रमुख डॉ. विठ्ठल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शाखांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.