loader image
[ays_poll id=7]

आमदार कांदे यांची मध्यस्थी : नाईक यांचे आंदोलन स्थगित

Sep 30, 2022


मनमाड : पोलिसांनी दाखल केलेल्या ३५३ गुन्ह्याची शहानिशा करून चौकशी करावी अन्याय होणार नाही अशी भूमिका पोलीस प्रशासनाने घ्यावी यासंदर्भात आमदार सुहास कांदे यांनी थेट पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याशी फोनवर चर्चा करत स्मशानभूमीत आंदोलनास बसलेले शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रविण नाईक यांना दिलासा दिला यामुळे आंदोलनाची सांगता करण्यात आली.

रेल्वे रुळावर आत्महत्या केलेल्या इसमाचा मृतदेह पडल्याने आपण पोलिसांना फोन करा असा रेल्वे कर्मचाऱ्यांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रविण नाईक यांना सांगितले होते त्यानुसार त्यांनी पोलिसांना आणि आरपीएफ यांना फोन करत माहिती दिली मात्र घरी गेल्यावर कळले की आपल्यावर ३५३ चा गुन्हा दाखल झाला असून हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने या गुन्ह्याची उच्चस्तरीय सीबीआय चौकशी करावी या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रविण नाईक हे स्मशानभूमीत धरणे आंदोलनास बसले होते गुरुवारी आमदार सुहास कांदे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले यावेळी नाईक यांनी आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची माहिती दिली त्यावेळी आमदार सुहास कांदे यांनी थेट पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना फोनवर संपर्क केला सदर गुन्ह्याची चौकशी करा, गुन्हा खोटा असेल तर नाईक यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यावर अन्याय होता कामा नये अशी मागणी केली पोलीस अधीक्षक श्री पाटील यांनी चौकशी करणार असल्याचे आमदार कांदे यांना कळविले असून आमदार सुहास कांदे यांनी मध्यस्थी केल्यामुळे श्री नाईक यांनी सुरू असलेले आंदोलन स्थगित केले आहे यावेळी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंग साळवे, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, संजय कटारिया, अशोक पदमर, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, सुनील हांडगे, राजेंद्र भाबड, दिनेश केकान, कैलास भाबड,  प्रवीण सूर्यवंशी, प्रशांत हिरण, राजू कासार, विलास कटारे, विजय मिश्रा, प्रमोद पाचोरकर, योगेश पाटील, माजी नगरसेवक अमजद पठाण, वाल्मिक आंधळे, हबीब शेख, अनिल दराडे, विजय सानप, अण्णा घुगे, इरफान शेख, सनी फसाटे
यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.