loader image
[ays_poll id=7]

भाजपा मनमाड शहर दिव्यांग आघाडी तर्फे सेवा पंधरवडा अंतर्गत दिव्यांग बांधवांना रुग्ण उपयोगी साहित्य वाटपा सह विविध सेवा कार्यक्रमा चे आयोजन

Sep 30, 2022


भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे जन्म दिना निमित्त सध्या सेवा पंधरवडा सुरू आहे याच उपक्रमात भाजपा मनमाड शहर दिव्यांग आघाडी चे शहर अध्यक्ष दीपक पगारे यांचे संकल्पनेतून आणि भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांचे मार्गदर्शनाने मनमाड शहरातील दिव्यांग बांधवांसाठी सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे,हे होते तर मनमाड नगर पालिका अंतर्गत येणाऱ्या दिनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानचे ( DAY – NULM ) मनमाड शहर अभियान व्यवस्थापक विलास कातकडे , संदिप आगोने , याच अभियानचे समुदाय संघटक श्रीवर्धन कुशारे , भाजपा मनमाड शहर दिव्यांग आघाडी अध्यक्ष दीपक पगारे ,भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितिन परदेशी,शहर सरचिटणीस दीपक गोयल,भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा चिटणीस गौरव ढोले ,भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस अक्षदाताई पगारे,नजमा अन्सारी, अमित सोनवणे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते. भाजपा दिव्यांगआघाडी तर्फे सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले दिपक पगारे यांनी कार्यक्रमा चे प्रास्ताविक केले तर नितिन परदेशी यांनी सूत्र संचालन केले भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे सर्वच मान्यवराचे हस्ते उपस्थित दिव्यांग बांधवांना श्रवण यंत्र, वाकर, आधार काठी अश्या विविध रुग्ण उपयोगी वस्तूचे तसेच 12 रूपये किमती च्या अपघाती विमा चे मोफत वाटप करण्यात आले तसेच उपस्थितांचे मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे साठी अर्ज ही या वेळी भरून घेण्यात आले. भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे नव्या लाभार्थीना नगरपालिका लाभातून दीव्यांग 5% राखीव निधी मिळणे साठी उपस्थित अधिकाऱ्यांना अर्ज देण्यात आले देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री डॉ.सौ भारतीताई पवार यांचे सक्षम नेतृत्वात भाजपा सेवा ही संघटन हा उपक्रम आदर्श पद्धतीने राबवत आहे केंद्र व राज्य सरकारच्या सर्व लोककल्याणकारी योजना मनमाड शहरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते योग्य लाभार्थी पर्यंत पोहचविण्यासाठी अथक परिश्रम करीत आहेत सर्व सामान्य जनतेचे हित हाच भाजपा च्या कार्याचा केंद्र बिंदू आहे असे आपले अध्यक्षीय भाषणात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे यांनी सांगितले विविध केंद्रिय योजना संबधित अभ्यासपूर्ण माहिती विलास कातकडे ,संदीप आगोने यांनी या प्रसंगी दिली तसेच मा मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांचे मार्गदर्शन खाली दिवाळी पूर्वी मनमाड शहरातील 422 दिव्यांग बांधवांना नगर पालिकेच्या 5% राखीव दिव्यांग निधीमधुन दिव्यांगाचे टक्केवारी नुसार दिव्यांग निधीचे वाटप करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले .या कार्यक्रमास
भाजपा दिव्यांग आघाडी मनमाड सरचिटणीस सुनिता वानखेडे, हिना बागवान, योगेश रानडे, आरती आहिरे, ज्योती गरुड, सारिका धिवर, लक्ष्मी उबाळे, सुशील उबाळे, सचिन हिरे, राजेश आहिरे, संदीप जाधव, विजय जाधव, तुषार पगारे, रमेश मोरे, अनिल चंदनशिव, सोपान गवळी, ललिता आहिरे, कविता गरुड, रंजना जाधव, नजमा पठाण, राजु पाजगे,शकुंतला आहिरे,सुनिता जाधव आदी मान्यवरांसह दिव्यांग बांधव ,भाजपा पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संखयेने उपास्थित होते कार्यक्रमाचे संयोजन भाजपा दीव्यांग आघाडी अध्यक्ष दिपक पगारे, सरचिटणीस नितिन परदेशी अक्षदा पगारे आदी नी केले


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.