loader image
[ays_poll id=7]

कॅम्प नं २ मध्ये पथदीप बसवावेत – फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच ची मागणी

Sep 30, 2022

मनमाड – (कादिर शेख)

मनमाड कॅम्प विभाग शाळा क्र. 14, सियोन कॉलोनी, डमरे कॉलोनी, संत बर्णाबा चर्च व शाळेमागील संपूर्ण भाग या भागात मागील अनेक वर्षांपासून पथदीप खांब व पथदीप नाही कॅम्प विभागातून जाणारा हा मुख्य रस्ता आहे, या परिसरातील प्रत्येक नागरिक, शाळेतील लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, याच रस्त्यावरून ये जा करीत असतात आणि अशा दाट अंधारात त्यांचे अतोनात हाल होत आहे. रस्त्यावर लाईट नाही त्यात रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, माती व पावसाळ्यात त्यात साचलेले पाणी यापासून येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक, समाजसेवक व फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच यांचे एक शिष्ठ मंडळ मनमाड नगर परिषद विद्युत विभाग येथे जाऊन विद्युत अभियंता श्री. मनोज मोरे यांची भेट घेतली व वरील समस्ये संदर्भात निवेदन देण्यात आले तसेच यावर लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन अधिकारी यांनी दिले आहे. यावेळी समाजसेवक पापाभाई थॉमस,फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरोज भाई शेख, शकुर शेख,सुरेश देसाई,इस्माईल पठाण, युनूस शेख व राहत फाउंडेशनचे कयाम सैय्यद उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.