नांदगावचे लोकप्रिय आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या विशेष सहकार्याने नांदगाव शहरातील लोकांसाठी रहेनुमा फाउंडेशनच्या माध्यमातून आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात नविन आधार नोंदणी दुरस्ती अपडेशन पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली होती. शिबिराचा फायदा घेत लहान मुलापासून वयोवृध्द लोकांनी सर्वांनीच एकच गर्दी करत आपल्या आधार कार्ड मध्ये आवश्यतेनुसार बदल करून घेतले सुरुवातीला तीन दिवस शिबिर ठेवण्यात आला होता परंतु लोकांची रांग संपता संपत नव्हती उत्तम नियोजन आणि फोंडेशनचे अचूक मार्गदर्शन मुळे लोकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत सर्वच जाती धर्माच्या व सर्वच छोट्या मोठ्या परिवारातील लोकांनी आधार कॅम्प मध्ये सहभाग नोंदविला. जामा मस्जिद ट्रस्टचे मोलाचे सहकार्य मिळाले.
या आधार कार्ड शिबिरात साकोरा आधार केंद्राचे संचालक श्री.कैलास हिरे , खादगाव केंद्राचे संचालक राजेंद्र वडकते, पानेवाडी आधार केंद्र संचालक आव्हाड, यांच्या टीम ने मिळून जवळपास 350 आधार धारकांनाच्या आधारात करेक्शन, अपडेशन, रजिस्ट्रेशन चे कार्य अत्यंत चोखपणे पूर्ण करून मोलाचे सहकार्य केले. शिबिरात काम केलेल्या सर्वच आधार केंद्र संचालक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांंना संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ तसेच आभारपत्र देवून सन्मानित करण्यात आले. शिबिरात फाउंडेशनच्या सभासदांनी आलेल्या लोकांना सर्वोतोपरी मार्गदर्शन केले विशेष करून राहील बागवान, हाजी सईद, अयाज भाई, अक्रम मोमीन रियाज सर. खलील दादा, इकबाल भाई, वसीम खान, अमजद पठाण सलमान खान, इम्रान, फहीम,रमिज,इत्यादींनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
























