loader image
[ays_poll id=7]

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात कबड्डी स्पर्धा संपन्न

Oct 1, 2022


मनमाड: दिनांक ०१/१०/२०२२ रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे संस्थेच्या ७० वा वर्धापन दिनानिमित्त नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन मान्यतेने एक दिवसीय मनमाड शहर पातळीवरील पुरुष खुला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या विस्तृत कार्याचा आढावा घेतला. महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी संस्थेची स्थापना करून अनेक गोरगरीब व शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवून संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक, सामाजिक व राजकीय विकास घडवून आणला. हिरे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपले योगदान समाजाच्या विकासासाठी दिले आहे. अशा या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह श्री मोहन अण्णा गायकवाड यांनी महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. कार्यक्रमास मनमाड शहराचे सामाजिक कार्यकर्ते रफिक खान प्रमूख पाहूणे म्हणुन उपस्थित होते. स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य श्रीमती अलकाताई शिंदे, श्री चंद्रकांतजी गोगड, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, पंच, पत्रकार, महाविद्यालयातील पदाधिकारी, मनमाड शहरातील क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा. संतोष जाधव तर आभार प्रदर्शन वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी.जे. आंबेकर यांनी मानले.
या स्पर्धेसाठी मनमाड शहरातील नामांकित असे कबड्डीचे १७ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी क्रीडा संचालक प्रा. संतोष जाधव, प्रा.महेंद्र वानखेडे, श्री रोहन बागुल यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.