मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेचा ७०वा वर्धापन दिन, राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयात संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे, संस्था संवर्धक लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. अरुण पाटील यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला, ज्ञानाची गंगा गोर -गरीब तसेच वंचितापर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मवीरांनी अथक प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नातून महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या संस्थांची स्थापना करून नाशिक जिल्ह्यातील तळागाळातील घटकांपर्यंत ज्ञानाची दारी सर्वांना उघडी करून दिली आज रोजी संस्थेच्या ९५ शाखा, उपशाखा कार्यरत आहेत तर ८०००० पेक्षा जास्त विद्यार्थी या शाखा मधून शिक्षण घेत आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून म. स. गा. महाविद्यालय मालेगाव चे प्रा. एन. डी. पगार होते त्यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री व कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश झोत टाकला. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला.महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून, कार्यक्रम अधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ प्रमोद आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्योती पालवे, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य पी. के. बच्छाव, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश गांगुर्डे,प्रास्ताविक डॉ. पी. बी. परदेशी तर आभार प्रा . दिलीप कातकाडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












