loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – संत श्री सेवालाल महाराज मूर्ती पूजन व बंजारा समाज सन्मान सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

Oct 2, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आ. सुहास कांदे यांच्या माध्यमातून मतदार संघातील ३५ बंजारा तांड्यावर विवाह सोहळयासाठी भव्य सभा मंडप (किंमत २० लक्ष रुपये ) उभारण्यासाठी निधी मंजूर झाला असून लवकरच भव्य असे मंगल कार्यालयाचे काम सुरू होणार आहे . या प्रत्येक मंगल कार्यालयात गौर बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराजांची मुर्ती देण्याचे आ. कांदे यांनी ठरविले होते .


बंजारा समाज बांधवाचा सन्मान सोहळा व संत श्री सेवालाल महाराजांच्या मुर्तीचे पुजन आज धर्मपीठ शक्तिधाम श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज,परमपूज्य कबीरदास महाराज,महंत रायसिंग महाराज यांच्या उपस्थितीत व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी हजारो बंजारा माता बंधू-भगिनी याप्रसंगी उपस्थित होते, आमदार सुहास कांदे व सौ अंजुम ताई कांदे यांनी पूजेला बसत मनोभावे संत श्री सेवालाल महाराज यांची विधिवत पूजा केली. बंजारा समाजातील महिलांनी पारंपारिक नृत्य करून आजच्या या आनंदात सहभाग नोंदविला, ढोल पथक, बंजारा हलगी वादक ग्रुप ने आपल्या वाद्य वृंदामुळे उपस्थितांना आपल्याकडे आकर्षित केले.
आ. सुहास कांदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आपण मला आमदार म्हणून निवडून दिले आहे आणि आपल्या प्रत्येक तांड्यांवर एक भव्य सभामंडप व भगवान संत श्री सेवालाल महाराजांची मूर्ती देऊन मी माझे कर्तव्य पार पाडत आहे यापुढेही प्रत्येक बंजारा तांड्यांवर एक वाचनालय व एक व्यायाम शाळा देणार असल्याचे सांगीतले.
या प्रसंगी आ. सुहास कांदे व शिवसेनेच्या वतीने आलेल्या प्रमुख संत महांताची साखरेने तुला केली व आशीर्वाद घेतले.


महंत जितेंद्र महाराज हे संत श्री सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज आहेत त्यांनी आपल्या भाषणात आजपर्यंत महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात संत श्री सेवालाल महाराजांचा धार्मिक कार्यक्रम कोणीही घेतला नाही तो पहिल्यांदा आ. सुहास कांदे यांनी घेतलेला हा सुंदर कार्यक्रम मी पाहत आहे आणि यामुळे मी खूप आनंदित झालो असल्याचे उपस्थित सर्व बंजारा बांधवांना सांगितले. आपण सर्व बंजारा समाज बांधवानी आ . कांदे यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांचे हात बळकट करू .
आ. सुहास कांदे यांनी सांगितल्याप्रमाणे हा राजकीय कार्यक्रम नसून धार्मिक कार्यक्रम आहे याप्रसंगी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
व्यासपीठावर तालुक्याचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे,राजेश कवडे,आनंद कासलीवाल, तेजदादा कवडे, नंदू पाटील,समाधान पाटील,डॉ पवार, किरण देवरे, गुलाबभाऊ भाबड,एकनाथ सदगीर,पुंजाराम जाधव, अमोल नांवदर,अरूण भोसले,संतोष भोसले,राहूल आंधळकर,उमेश उगले, राजाभाऊ पवार,गणेश शिदें,अँड .सचीन साळवे,डॉ. सुनील तुसे, वाल्मीक हेबांडे,राठोड साहेब यांच्यासह हजारो बंजारा समाज बांधव यावेळी उपस्थित होते .


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.