loader image
[ays_poll id=7]

आम्ही नांदगावकर पर्यावरणपूरक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

Oct 3, 2022


नांदगाव (विजय चव्हाण ) गणेशोत्सवात होणारे जल प्रदूषण रोखले जावे व आपले उत्सव परंपरेनुसार पर्यावरणाला बाधा न आणता साजरे करावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सामजिक कार्येकर्ते संजयदादा मोकळ यांनी सामजिक बांधिलकी म्हणून नांदगाव मध्ये पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव साजरे व्हावा यासाठी त्यांनी शालेय विद्यार्थ्यानं पासून सुरवात व्हावी यासाठी त्यांनी आम्ही नांदगावकर ,नांदगाव यांच्या वतीने गणेशोत्सव निमित्त आयोजित पर्यावरण पूरक घरगुती शाडूमाती गणेश मूर्ती व आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे बक्षिस वितरण नुकतेच संपन्न झाले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा.सुरेश नारायणे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून कुदरत अली शहा,समाभाऊ पारख,माजी सरपंच रणजित मंडोडिया,विष्णु बोळीज,भरत मोकळ,
हा कार्यक्रम म.गांधी व लाल बहाद्दूर शास्री यांच्या जयंती चा औचीत्य साधून करण्यात आला होता . प्रमुख पाहुन्यांच्या हस्ते सुरवातीला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार व गणेश मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्याचा परिचय व स्वागत संजय मोकळ यांनी केले प्रास्ताविकेत त्यांनी या स्पर्धे मागचा हेतू सांगून या पर्यावरण पूरक उत्सवात यापुढेही अधिक नागरिकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन केले.त्यांतर साळुंके सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .रंगनाथ चव्हाण यांनी या स्पर्धेची माहिती सांगून या अशा स्पर्धेसाठी जेष्ठ नागरिक संघ नेहमी पाठीशी असे सांगितले.

भरत मोकळ यांनी पर्यावरण पूरक उत्सवाचे महत्व विषद केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश नारायणे यांनी या अशा स्पर्धेमुळे नवीन पिढीला पर्यावरण पूरक उत्सवाची सवय लागेल व ज्यांनी हा उपक्रम सुरु केला त्याचे मनापासून कौतुक केले व अशा स्पर्धेतून विद्यार्थांना प्रोत्साहन मिळते असे सांगून बक्षिस पात्र विद्यार्थाचे व सहभागी स्पर्धकाचे अभिनंदन केले.

त्यानंतर कलाशिक्षक विजय चव्हाण यांनी उपस्थिता समोर गणपती उत्सवानंतर कशा प्रकारे प्रदूषण व देवाची विटंबना होते हे व्हिडीओ क्लिप मार्फत दाखविले .स्पर्धका मधून साई बोळीज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून कलाशिक्षक सुनिल वाघ सर यांनी काम पहिले
या स्पर्धेत विजेत्यांना सन्मान चिन्ह व रोख स्वरूपाचे बक्षिस देण्यात आले.प्रथम क्रमांक मानसी सुनिल सोर ,द्वितीय भाग्यश्री सुनिल वाघ ,तृतीय अर्णव सुमित गुप्ता व उत्तेजनार्थ भूमी किशोर पाटील यांना हे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश शर्मा यांनी केले व आभार श्री.रिया मोकळ यांनी मानले या प्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य
पत्रकार सुरेश शेळके,किरण भालेकर,जाधव नांदगाव नगरीतील नागरिक ,गणेशभक्त व सहभागी स्पर्धेक या कार्यक्रमाला उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.