loader image
[ays_poll id=7]

शारदीय नवरात्रौत्सव” आज नवमी माळ

Oct 4, 2022


मनमाड : (योगेश म्हस्के ) गेल्या आठ दिवसांपासुन सुरू असणाऱ्या नवरात्री उत्सवाची आज नवमी माळ , यंदाच्या वर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात नवरात्री साजरी करण्यात आली.

आज आपण मनमाड शहरातील पुरातन असणारे गोदावरी माता मंदिर पाहुया , गोदावरी माता मंदिर अनेक वर्ष पुरातन असुन कामानिमित्त मनमाड येथे स्थायिक झालेल्या दक्षिण भारतीय नागरिकांनी गोदावरी मातेची स्थापना केली आहे असे बोलले जाते. गोदावरी मातेचे रूप अठरा भुजा असुन मुर्ती समोर मातेचे वाहन असणारे सिंह विराजमान आहे.मंदिरा समोर महिषासुर आणि हवनकुंड असुन मंदिर परिसरात दिपमाळ , श्री महादेव मंदिर , श्री शनी मंदिर , श्री मारुती मंदिर आहे.मंदिर परिसर शांत आणि प्रसन्न असुन मंदिरा समोरून नदी वाहत असल्याने मंदिराला नैसर्गिक सौन्दर्य देखील लाभले आहे.काही वर्षांपुर्वी शहरातील आझाद हिंद केसरी ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता , आजही मंदिराची संपूर्ण व्यवस्था आझाद हिंद केसरी ट्रस्टच्या वतीने बघण्यात येत आहे.

 

नवरात्रीच्या काळामध्ये श्री गोदावरी माता मंदिर येथे नऊ दिवस यात्रा उत्सव भरत असुन , मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई करून अनेक धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते. मंदिर पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात येते, शहर आणि परिसरातील शेकडो भाविक हे नवरात्री काळामध्ये श्री गोदावरी मातेच्या दर्शनासाठी येत असतात.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.