loader image
[ays_poll id=7]

जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नवरात्रोत्सव साजरा

Oct 5, 2022

दि.4 ऑक्टोंबर 2022 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नुकताच नवराञोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी गरबा आणि दांडियात सहभागी होत एकच जल्लोष करत नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला.
विद्यार्थ्यांना विविध राज्यातील संस्कृती व परंपरा यांचा परिचय व्हावा व त्याचा आनंद लुटता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील मैदानावर सुबक व सुंदर रांगोळी काढून दांडिया नृत्य आखण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवदुर्गेच्या वेशात आलेल्या विद्यार्थिनींच्या व महिला शिक्षिकांच्या हस्ते दुर्गा मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी दुर्गा माता स्तोत्राचे गायनही करण्यात आले शाळेतील महिला शिक्षकांनी महिषासुरमर्दिनी मातेचे गीत गायन करून गरबा व दांडिया खेळायला सुरुवात केली. शाळेचे प्राचार्य श्री .मनी चावला यांनी यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी आमंत्रित केले. यावेळी शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
सर्व विद्यार्थ्यांना नवरात्रोत्सवानिमित्त संस्थेचे चेअरमन श्री. सुनीलकुमार कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा,प्रमिलाताई कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल,सर्व पदाधिकारी, प्रशासक प्रकाश, गुप्ता प्रिन्सिपल मनी चावला सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
.