loader image
[ays_poll id=7]

विजयदशमी निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडुन शस्त्र पुजन संपन्न

Oct 5, 2022


मनमाड 🙁 योगेश म्हस्के) विजयादशमी म्हणजेच दसरा निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मनमाड येथील संत गजानन महाराज मंदिर येथे शस्त्रपुजन करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख उत्सवांपैकी एक असणारा विजयादशमी उत्सव दरवर्षी संघ स्वयंसेवकांकडुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो, 1925मध्ये विजयादशमीच्या मुहुर्तावर संघाची स्थापना झाली होती. आज संघाचा 98 वा स्थापना दिवस असुन संघ आपल्या शतक महोत्सवी वर्षाकडे यशस्वी वाटचाल करत आहे.

आज मनमाड शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडुन शस्त्रपुजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. नितीन जैन आणि प्रमुख वक्ते म्हणुन मालेगाव जिल्हा सहकार्यवाह श्री बाबासाहेब गांगुर्डे हे उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे डॉ. श्री नितीन जैन यांनी आपल्या भाषणात संगीतले की संघाचे काम हे समाजासाठी असुन जेव्हा कधी समाजामध्ये आपत्ती स्वरूप परिस्थिती असते, तेव्हा संघाचे स्वयंसेवक हे समाजाच्या मदतीसाठी पुढे येत असतात , प्रमुख अतिथी डॉ. जैन , संघ हा पक्ष नसुन एक परिवार आहे , संघाने समाजातील महिलांचे सबलीकरण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, संघाचे समाजातील योगदान मोठे आहे.

प्रमुखवक्ते श्री बाबासाहेब गांगुर्डे यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की संघाची स्थापना ही समाजाच्या प्रगतीसाठी झाली असुन अनेक प्रतिकुल परिस्थितीचा सामना करून आज संघ 97 वर्ष पुर्ण करून 98 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. संघाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा असुन आज संघाचा स्थापना दिन आहे , समाजाच्या संघटनसाठी संघटना या तत्वाच्या आधारे डॉ.हेडगेवार यांनी संघाची 1925 साली स्थापना केली , समाज मनावर संस्कार करणारी संघटना म्हणजे संघ होय , आज भारत देशासह एकुण 34 देशात संघाचे काम सुरू आहे.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि स्वयंसेवकांकडून शस्त्रपुजन करून संत गजानन महाराज मंदिरापासून शहरातील मुख्य चौक आणि मार्गावर सघोष संचलन काढण्यात आले , यावेळी शहरातील संघाचे जेष्ठ कार्यकर्ते , शहर भाजपाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
.