loader image
[ays_poll id=7]

रविवारी भगवान वाल्मीकी जयंती तसेच ईद – ए – मिलाद : आठवडे बाजारातील व्यावसायिकांनी मिरवणूक मार्गावर दुकाने ठाटू नये – मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

Oct 6, 2022


मनमाड शहरातील सर्व फळ विक्रेते ,भाजी विक्रेते तसेच सर्व व्यावसायीकांना नगरपालिका प्रशासनातर्फे सूचित करण्यात आले आहे की, रविवार दिनांक 09 ऑक्टोबर 2022 रोजी भगवान महर्षि वाल्मिकी जयंती तसेच मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरुन मिरवणूक काढण्यात येणार असून मिरवणूक मार्गात अडथळा निर्माण होऊ नये याकरिता सर्व व्यवसायीकांनी आठवडे बाजार रस्त्यात अडथळा निर्माण होऊ नये करीता तसेच आठवडे बाजार भागातील मुख्य रस्त्यावर रविवार रोजी आप आपली दुकाने बंद ठेवावी अथवा मिरवणुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. याबबाबत कायदा व सुव्यवस्थे चा प्रश्न निर्माण झाल्यास अडथळा निर्माण करणाऱ्या व्यवसायीकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी
मिरवणूक मार्ग ;- इदगाह वाल्मिकी नगर पासून आठवडे बाजार परिसर –शनिमंदिर रोड महालक्ष्मी चौक ते नगर परिषद कार्यालय ते स्टेशन रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाष रोड नेहरू भवन परिसर . व इदगह या परिसरातील आठवडे बाजार बंद राहील याची सर्वानी नोंद घ्यावी
प्रशासक तथा मुख्याधिकारी
मनमाड नगर परिषद,मनमाड


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.