loader image
[ays_poll id=7]

ऑक्टोंबर सेवा सप्ताहांतर्गत हाडांचा ठिसूलपणा आणि कॅल्शिअम तपासणी शिबिर संपन्न

Oct 6, 2022


लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी आयोजित ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत गुरुवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी मनमाड येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर शांताराम कातकडे यांच्या अथर्व हॉस्पिटल येथे हाडांचा ठिसूळपणा व कॅल्शिअम तपासणी शिबिर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी व्यासपीठावर लायन्स क्लबच्या अध्यक्षा वैशाली वाणी, सेक्रेटरी रेखाताई येणारे, डॉक्टर शांताराम कातकडे,डॉक्टर निलेश राठी, व्यासपीठावर उपस्थित होते. ऑक्टोबर सर्विस विक चेअर पर्सन लायन राजेंद्र माळी यांनी सूत्रसंचालन केले. बायोटीन फार्मा या कंपनीचे राज अकर व जगताप उपस्थित होते. यांच्या सौजन्याने हे शिबिर आयोजित होते याप्रसंगी लायन्स क्लबचे सदस्य ॲडवोकेट शशिकांत व्यवहारे, डॉक्टर प्रो जे वाय इंगळे, चंद्रकांत मेघाने, डॉक्टर सागर कोल्हे, सिद्धार्थ जोगदंड एमजेएफ डॉक्टर संजय सांगळे उपस्थित होते. जवळपास 101व्यक्तींची कॅल्शियम बीएमसी तपासणी करण्यात आली.अथर्व हॉस्पिटल चे नवनाथ कनकुसे व शशी पवार यांनी नियोजन केले . उपस्थितांना डॉक्टर शांताराम कातकडे यांनी समतोल आहार व कॅल्शियमची कमतरता कशी भरून निघेल यावर सुलभ भाषेत मार्गदर्शन केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.