समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा 120 किमी राहणार असून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महामार्गावरील कमाल वेगमर्यादेसंदर्भात वाहतूक विभाग अप्पर डीजीपींकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, समृद्धी महार्गावर दुचाकी, चारचाकी रिक्षा अणि तीन चाकी रिक्षा, तसेच तीन चाकी कोणत्याही वाहनांना संचार करण्याची परवानगी नसणार आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिसूचनेत वेगमर्यादा 120 किमी एवढी निश्चित करण्यात आली आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कुलवंत सारंगल यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.
समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा नियम :
वाहनचालकासह 8 प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहनांसाठी समतल भागांत 120 कि. मी. प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 100 कि. मी. प्रति तास.
वाहनचालकासह 9 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी समतल भागांत 100 कि. मी. प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 80 कि. मी. प्रति तास.
माल आणि सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी समतल भागांत 80 कि. मी. प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 80 कि. मी. प्रति तास.
या मार्गावर दुचाकी अणि तीन चाकी रिक्षांसह इतर वाहानांना संचार करण्याची परवानगी नाही.