निलेश व्यवहारे –
नाशिक ग्रामीण चे पोलीस अधीक्षक श्री.सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री.चंद्रकांत खांडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड श्री.समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे, पोलीस हवालदार रमेश आवारे, पोलीस हवालदार कोरडे व होमगार्ड पथक यांनी वरचा कोळीवाडा, वडनेर भैरव तसेच वडार वस्ती, वडनेर भैरव येथील एकूण चार ठिकाणी गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकत एकूण 1100 लिटर गावठी दारू बनवण्याचे रसायन (किंमत 55,000 रुपये) तसेच 160 लिटर गावठी दारू (किंमत 16,000 रु) असे एकूण 71,000 रु किंमतीचे गावठी दारू बनविण्याचे रसायन व गावठी दारू ताब्यात घेतली तसेच रसायन जागेवर नष्ट करण्यात आले असून 1 पुरुष व 3 महिला असे एकूण 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दारूबंदी अधिनियमान्वये 4 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. सदर कारवाईबाबत वडनेर भैरव गावातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.