loader image
[ays_poll id=7]

नाशकात बर्निंग बस चा थरार – १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू , ३८ जखमी

Oct 8, 2022


नाशिक येथे नांदुरनाका परिसरातील हॉटेल मिरची जवळ खाजगी बस व आयशर ट्रेलर अपघातात बसला भीषण आग लागून १२ प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे तर ३८ जण जखमी झाले आहेत. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी तातडीने जिल्ह्याधिकारी गंगाधर डी आणि पोलीसआयुक्त नारनवरे यांचेशी फोनवर बोलणे केले आहे.या घटनेत १२ जणांचा मृत्यू तर ३८ जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना शिंदे याच्या सह केन्द्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार,पालकमंञी दादा साहेब भुसे यांनीदिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजेत.
उपचारात काहीही कमी पडू देऊ नका, अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नाशिक बस दुर्घटनेबाबत सर्व बाबी तपासण्यात येतील तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. परंतू आता जे जखमी आहेत, त्यांना उपचार देण्याला प्राधान्य द्यावे, अशा सुचना दिल्या असल्याचे शिंदे म्हणाले. ही बस मुंबईकडून यवतमाळकडे जात होती. त्यावेळी एका टँकरला धडकल्यामुळे बसला आग लागल्याची घटना घडली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जखमी असणाऱ्यांपैकी दोन ते तीन जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी स्वत: महापालिका व
पोलिस आयुक्त हजर असल्याचे शिंदे यांनी सांगितले. जखमींवरचा उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे, तर मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. याबाबतअधिक तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

आमदार सुहास आण्णा कांदे यांना नाशिक येथे झालेल्या बस अपघाताची माहिती मिळताच आमदार कांदे यांनी तात्काळ नाशिक शासकीय रुग्णालयात धाव घेत रुग्णांची विचारपूस केली.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली असून आज नाशिक येथे भेट देण्याची शक्यता आहे.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
.