loader image
[ays_poll id=7]

हिसवळ खुर्द येथील जवान नवनाथ आहेर यांचे अपघाती निधन

Oct 8, 2022


नांदगाव – सोमनाथ घोंगाणे
नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द येथील सीआरपीफ जवान नवनाथ पुंजाराम आहेर (वय २६ ) यांचा अपघातात मुत्यू
हिसवळ खुर्द येथील सी. आर. पी. एफ जवान नवनाथ आहेर हे मोटार सायकल ने मनमाड येथून हिसवळ येथे जात असताना जोधंळवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाला धडक दिल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली असून हिसवळ गावावर शोककळा पसरली आहे.

मनीपूर येथे सी आर पी एफ मध्ये कार्यरत असलेले नवनाथ आहेर (२६) पंधरा दिवसांच्या सुट्टी वर आलेले होते. शुक्रवार (दि.७) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते मोटार सायकलने मनमाड हुन हिसवळकडे येत असताना जोंधळवाडी जवळ पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकल्याने जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली. गेल्या पाच वर्षांपूर्वी ते सैन्यात दाखल झाले होते त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी आणि पाच महिन्यांची मुलगी आहे.
 सीआरपीफ जवान नवनाथ आहेर यांच्या पार्थीवावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात नाशिक येथून आलेल्या रॅपिड अँक्शन टीम च्या जवानानीं अखेरची सलामी दिली. १४३ सी. आर . पी . एफ बटालियन च्या कमान अधिकारी यांनी या दु:खद प्रसंगी आम्ही परिवारासोबत आहोत . असा संदेश दिला शेवटी राष्ट्रगीत आणी भारत माता की जय वीर जवान अमर रहे . च्या घोषणा देवून दु:खद अंत:करणाने जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला .

आ. सुहास कांदे यांच्या वतीने शिवसेना शहरप्रमुख सुनिल जाधव, सागर हिरे, तलाठी आठवले, सर्कल राजपूत, ग्रामसेवक भाबड, ग्रामपंचायत सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, नानासाहेब काकळीज यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
.