loader image
[ays_poll id=7]

लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी च्या सप्ताहाची मोफत मधुमेह तपासणी ने सांगता

Oct 9, 2022


मनमाड – लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी द्वारा आयोजित आणि दि प्रगती अर्बन को-ऑप.बॅंक लि.मनमाड प्रायोजित ऑक्टोबर सेवा सप्ताहाची सांगता सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ ला.डाॅ.नुतन पहाडे सर यांच्या कुंदन हाॅस्पिटल येथे मोफत मधुमेह,ब्लडप्रेशर तपासणी व उपचार या सेवा कार्याने झाली. या शिबिरास मॅॅनकाईंड फार्मा लि.चे शंकर ढोमसे यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सिनियर ला.अँड.शशिकांत व्यवहारे यांनी केले.आजच्या कॅम्प चे प्रकल्प संयोजक ला.डाॅ.पहाडे सर यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच Mankind Farma चे शंकर ढोमसे यांना क्लब चे सिनियर सभासद MJF ला.डाॅ. प्रताप गुजराथी सर व अध्यक्षा ला.वैशाली वाणी यांनी भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.आजच्या शिबिराचा सुमारे 125 लाभार्थीनी लाभ घेतला. आज समारोप शिबिरात ला.ॲड.किशोर सोनवणे,ला.पुष्पा मतकर, सुनिता डघळे,ला.डाॅ.प्रा. इंगळे सर, नितीन पवार, अविनाश पारखे,मंत्री,कापसे,सुुमन रणदिवे,चंद्रकांत मेंगाणे,रेखा येणारे,भारत जगताप,डाॅ.निलेश राठी,आदि लायन सभासद उपस्थित होते.संपूर्ण सप्ताहाचे यशस्वी नियोजन व अंमलबजावणी करण्याची धुरा माजी अध्यक्ष व सप्ताह प्रमुख ला राजेंद्र माळी यांनी केले. त्यांना डाॅ.निलेश राठी,व सिद्धार्थ जोगदंड यांचे सहकार्य लाभले.आभार प्रदर्शन डाॅ.राठी यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.