अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या २५ पेक्षा जास्त दिव्यांग मुलांना वैद्यकीय स्वरूपात मदतीचा हात देत त्यांना व्याधी मुक्त केले आहे . आज खऱ्या अर्थाने ते समाजात सर्व सामान्य मुलांसारखे खेळू बागडू शकतात.
फोटो कॅपेंशन : मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख , केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर, लहान मुलांचे अस्थी शल्य चिकित्सक डॉ निखिल चल्लावर , ,भूल तञ् डॉ. संदीप भंगाळे, विपणन व्यवस्थापक पियुष नांदेडकर , व्याधी मुक्त झालेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक आदि .
नाशिक : प्रतिनिधी १२ वर्षीय जान्हवीला ( नाव बदलेले आहे ) जन्मापासूनच पाठीच्या कण्यातील दोष होता, ज्याला “स्कोलियोसिस” असे म्हणतात. मात्र, वयाच्या २ ऱ्या वर्षापर्यंत अशी कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, ज्यामुळे ती या आजाराने ग्रस्त असल्याचे सूचित होत नव्हतं. जेव्हा तिच्या पालकांना तिच्या प्रमुख विकासाच्या टप्यात विसंगती आढळली.जसे कि वयानुरूप वजन व उंची न वाढणे , तिला चालताना हि त्रास जाणवणे. जान्हवीची प्रकृती दिवसगणिक बिघडत असल्याचे पाहून तिच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. तिच्या एक्स-रे मध्ये असे दिसून आले की, तिला स्कोलियोसिस आहे. पाठीच्या कण्यातील कलही हळूहळू जड होऊ लागला होता आणि त्यामुळे तिला पायात अशक्तपणा जाणवू लागला होता या सोबतच चालताना संतुलन राखण्यातही त्रास होऊ लागला होता. हे पाहता, हाडातील विकृती दुरुस्त करण्यासाठी आणि त्याचा आकार बिघडण्यापासून रोखण्यासाठी Scoliosis Deformity शस्त्रक्रिया करण्यात आली. असामान्य कोन आणि पाठीचा स्तंभ वाकल्यामुळे पाठीच्या कण्यातील विकृती सुधारण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते. तथापि, न्यूरो मॉनिटरिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञाच्या साह्याने पेडिकल स्क्रू आणि रॉड 100% अचूकतेसह योग्य आणि अचूकपणे स्थित होतात. यामुळे मज्जारज्जुला इजा होत नाही तसेच पायाला अर्धांगवायू चा धोका टाळता येतो. शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली आणि आता तिला दैनंदिन कामात इतरांवर अवलूंबून राहावे लागत नाही. जान्हवी आता खऱ्या अर्थाने ताठ मानेने जगू शकते
हि शस्त्रक्रिया यशस्वीतेसाठी शल्य विशारद तज्ञ् डॉ चंदन महंती , डॉ निखिल चल्लावर , भूलतज्ञ् डॉ संदीप भंगाळे , बालरोग तज्ञ् डॉ सुशील पारख , यांच्या सहकार्यामुळे हि अवघड शास्रकीर्या करण्यात टीमला यश आले. संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
___
लहान मुलांमधील जन्मजात असणारी अस्थी व्यंग दूर करण्यासाठी लागणारी सर्व अत्याधुनिक उपकरणे , विशिष्ठ इन्फ्रास्टक्चर तसेच सर्जन सह इतर संपूर्ण टीम एकाच छताखाली उपलब्ध आहे. व त्यामुळे हे उपचार आपण मुंबई ,पुणे , इंदोर सारख्या शहरामध्ये उपचारासाठी जावे लागत होते. परंतु हि सुविधा नाशिक मध्ये उपलब्ध झाल्यामुळे वेळ आणि पैसा वाचणार आहे . यासोबत लहान मुलांमधील अस्थी विकार दूर होण्यासाठी ज्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा रुग्णसाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नेहमीच पुढाकार घेत असते. आणि त्याच्यासाठी आर्थिक आधार देत असतं म्हणून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल सर्वसमावेशक पर्याय म्हणून उत्तर महाराष्ट्रात पुढे आले आहे.
डॉ सुशील पारख – मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशु व बालरोग तज्ञ् , अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ,नाशिक
_____
पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल जलद आणि अचूक निदान यांच्या जोरावर आपण अतिशय किलिष्ठ आजारावर देखील निसंकोच परिणामकारक उपचार करू शकतो. अगदी लहान मुलांपासून ते सर्व वयाच्या रुग्णांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात आम्ही कौशल्य प्राप्त केले आहे. सदर रुग्णाच्या उपचारात या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून एक वेगळी ओळख उत्तर महाराष्ट्रात निर्माण केली आहे . या सोबतच सामाजिक बांधिलकी जपत अवश्यकता भासल्यास आर्थिक निधी उभा करून गरजू रुग्णावर उपचार केले जात आहेत म्हणून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे सर्वसामान्यचे रुग्णालय म्हणून पुढे आले आहे.
समीर तुळजापूरकर – केंद्र प्रमुख, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक