loader image
[ays_poll id=7]

मनमाडमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

Oct 10, 2022


मनमाड : ( योगेश म्हस्के)आश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. असे मानले जाते की या दिवसापासून शरद ऋतू म्हणजे हिवाळा सुरू होतो. शरद पौर्णिमेच्या रात्री लोक दूध बनवतात आणि मोकळ्या आकाशाखाली ठेवतात आणि प्रसाद म्हणून या दूधाचे सेवन करण्यात येते.

खरंतर चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवण्याला वैज्ञानिक महत्त्व आहे. वास्तविक, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. अशा स्थितीत चंद्राच्या किरणांचे रासायनिक घटक पृथ्वीवर पडतात. अशा परिस्थितीत जर दूध संपूर्ण रात्र चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवली गेली तर ते घटक दुधामध्ये शोषले जातात. या रासायनिक घटकांमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादी असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे दुध पिल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. असे मानले जाते की जर हे दुध चांदीच्या भांड्यात ठेवली तर त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात.
शरद पौर्णिमा हा देवी लक्ष्मीचा प्रकट दिवस मानला जातो. असे म्हटले जाते की याच दिवशी देवी लश्र्मी समुद्र मंथनातून उत्पत्ती झाली. त्यामुळे या दिवशी नारायणसोबत देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते.

मनमाड शहरात देखील कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात नागरिकांकडुन साजरी करण्यात आली.शहरातील मनमाड गुरुद्वारा , श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र आणि शहरातील नागरिकांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. मनमाड गुरुद्वारा येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भजन , लंगर आणि अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र येथे रात्री बारा वाजता श्री लक्ष्मी ,श्री कुबेर आणि श्री चंद्र पुजन करून दूधाचाप्रसाद सेवेकऱ्यांना देण्यात आला.
 


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
.