मनमाड – ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल निशाणी मिळाल्यानंतर आज मनमाडला एकात्मता चौकात आजी माजी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जमत मशाल पेटवत जल्लोष केला. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल चिन्ह दिल्यानंतर शिवसैनिक हातात मशाल घेऊन रस्त्यावर उतरले. त्यानंतर त्यांनी एकात्मता चौकात फटाक्याची आतषबाजी करत मशाल पेटवून जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेनेची निशाणी मशाल, आमची निशाणी मशाल अशा घोषणा देत या निशाणीला घराघरात पोहचविणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.
मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...











