loader image

लटकेंचा राजीनामा उद्या सकाळी ११वाजेपर्यंत स्वीकारा – मुंबई महापालिकेला कोर्टाचा आदेश

Oct 13, 2022


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील उमेदवारीचा तिढा आता सुटला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे.

ऋतुजा लटकेंचा राजीनामा उद्या 11 वाजेपर्यंत स्वीकारा असा थेट आदेश कोर्टाने मुंबई महापालिकेला दिला आहे.

“मला न्याय मिळाला आहे. आता रमेश लटके यांचं काम पुढे घेऊन जाणार,” अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर दिली आहे.

तसेच माझ्यावर आरोप कोणी केले हे माहिती नाही. पण हे आरोप चुकीचे आहेत, असा दावासुद्धा त्यांनी मीडियाशी बोलताना केला आहे.

ऋतुजा लटके या महानगरपालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांचे पती रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर आलेल्या पोटनिवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला आहे.


अजून बातम्या वाचा..

.